SIP Crorepati : व्हायचंय करोडपती तर इतक्या रुपयांची हवी SIP, काय आहे गुंतवणुकीचा मंत्र

SIP Crorepati : SIP मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला करोडपती होता येईल. पण त्यासाठी मोठी रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. तसेच योग्य म्युच्युअल फंड निवड करणे पण आवश्यक आहे. काही वर्षांनी तुम्हाला फायदा होईल.

SIP Crorepati : व्हायचंय करोडपती तर इतक्या रुपयांची हवी SIP, काय आहे गुंतवणुकीचा मंत्र
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : दरमहा काही रक्कम जमा करुन तुम्हाला करोडपती होता येते. झटपट श्रीमंत होण्यासाठी काही जण शेअर बाजाराचा रस्ता धरतात. पण त्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास, तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील (Share Market) चढउताराचा सामना करायचा नसेल तर म्युच्यु्अल फंड हा चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. करोडपती होण्यासाठी गुंतवणूकदाराला दर महा ठराविक रक्कम एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. काही म्युच्युअल फंडांनी (Mutual Fund) गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगचा मोठा फायदा होतो. तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो.

इतक्या वर्षांसाठी करा गुंतवणूक

म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला कोट्याधीश व्हायचे असेल तर त्यासाठी 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. MFI, फंड्सइंडिया रिसर्चनुसार, 10,000 रुपयांच्या SIP मध्ये गुंतवणूकदारांना 20 वर्षांत करोडपती केले होते. 20,000 रुपये दरमहा गुंतवल्यास, 15 वर्षांत अथवा 25,000 हजार जमा केल्यास 13 वर्षांत करोडपती होता येते.

हे सुद्धा वाचा

10 वर्षांत व्हा करोडपती

10 वर्षांत पण करोडपती होता येते. अर्थात त्यासाठी दरमहा 40,000 रुपयांची SIP करावी लागेल. ही रक्कम जितकी वाढेल, तितका श्रीमंतीचा हा कालावधी कमी होईल. तुम्ही लवकर करोडपती व्हाल. पण अर्थातच त्यासाठी आर्थिक बजेटकडे लक्ष द्यावे लागेल. तुमची कमाई किती आहे. खर्च किती आहे. त्याआधारे गुंतवणुकीचे नियोजन करता येईल.

म्युच्युअल फंड म्हणजे काय

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे म्युच्युअल फंड एक माध्यम आहे. शेअर बाजाराची अनेकांना भीती वाटते,त्यातील बारकाव्यांचा अभ्यास नाही, ज्यांना जोखीम नकोय, ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतात. फंड हाऊस गुंतवणूकदारांची रक्कम योग्य पद्धतीने विविध सेक्टरमधील शेअरमध्ये गुंतवतात. त्याआधारे नफा कमवितात आणि तो गुंतवणूकदारांमध्ये वाटतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पण बाजारातील जोखीम आधारीत असते.

लार्ज कॅप फंड्स फायद्याच

बाजारातील तज्ज्ञानुसार, लार्ज कॅप फंडात तुम्ही पैसा गुंतवू शकता. त्यामध्ये आतापर्यंत जोरदार रिटर्न मिळाले आहेत. गुंतवणूकदार मिडकॅप फंडमध्ये पैसा गुंतवू शकतात. इक्विटी फंड ही गुंतवणुकीसाठी योग्य. तर गुंतवणुकीतील काही हिस्सा डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतविता येईल.

सूचना : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकही बाजारअधीन आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. योग्य फंड निवडा. गुंतवणुकीचा सातत्याने पडताळा घ्या.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.