Retirement Planning | सेवानिवृत्तीनंतर आपणही होऊ शकता करोडपती; अशाप्रकारे करा पैशांचे नियोजन

सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे वास्तवात म्युच्युअल फंडामध्ये थोडीथोडी मासिक/तिमाही गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला आधी ठरवलेली एक रक्कम गुंतवू शकता. (You too can become a millionaire after retirement; Here's how to put money together)

Retirement Planning | सेवानिवृत्तीनंतर आपणही होऊ शकता करोडपती; अशाप्रकारे करा पैशांचे नियोजन
सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार थकबाकीचा लाभ
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:58 PM

नवी दिल्ली : आपल्याकडे अधिकाधिक पैसे असावेत, आपण लखपती, करोडपती व्हावे, सेवानिवृत्तीनंतर ऐशारामी जीवन जगावे, असे कुणाला बरं वाटत नसेल. प्रत्येक व्यक्तीची अशीच सुप्त इच्छा असते. पण अनेकांना करोडपती कसे व्हायचे, याचा मूलमंत्र सापडलेला नसतो. अशा लोकांनी पैशांचे योग्य नियोजन केले तर ते नक्कीच करोडपती होऊ शकतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्ही करोडपती बनू शकतात, यासाठी पैशांचे कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे ते आज आपण याठिकाणी जाणून घेऊया. (You too can become a millionaire after retirement; Here’s how to put money together)

जर तुम्ही नोकरीच्या सुरुवातीपासूनच काही प्रमाणात बचत करणे सुरु कराल आणि ही बचत सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल तर दिर्घ मुदतीत तुम्ही खूप रक्कम जमा करू शकाल. सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे वास्तवात म्युच्युअल फंडामध्ये थोडीथोडी मासिक/तिमाही गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला आधी ठरवलेली एक रक्कम गुंतवू शकता.

आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही आपली जोखिम पत्करण्याची क्षमता, गुंतवणुकीचा अवधी आणि आर्थिक उद्दीष्टाच्या हिशोबाने एका इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करून त्यात एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांची गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारच्या रक्कम गुंतवणुकीतून सेवानिवृत्तीच्या वेळी तुम्ही करोडपती बनू शकता.

एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार रिटर्न

दिर्घ कालावधीसाठी एसआयपीच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठी रक्कम मिळवण्यास खूप मदत होऊ शकते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून तुम्हाला कमीत कमी 12 टक्के रिटर्न अर्थात परतावा मिळू शकतो.

एसआयपीच्या माध्यमातून किमान गुंतवणूक

जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी एक्करक्कम नसेल, तर म्युच्युअल फंडात सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. गुंतवणुक सुरू केल्यानंतर तुम्ही मधे कधीही रक्कम वाढवू शकता. अशाप्रकारे एक छोटीशी रक्कम तुम्हाला मोठा निधी उभा करायला मदत करू शकते. जर तुम्ही कुठल्या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 5 किंवा 7 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला दिर्घ मुदतीमध्ये मोठी रक्कम मिळू शकते.

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा फायदा

शेअर बाजारातील चढ-उतारानुसारच इक्विटी म्युच्युअल फंडाची एनएव्हीसुद्धा बदलत असते़ जर तुम्ही कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये या महिन्यात 500 रुपये गुंतवले व त्यातून तुम्ही 10 युनिट खरेदी केले, तर पुढील महिन्यात त्याच तारखेला शेअर बाजारात मंदी आल्यानंतर तुम्हाला 11 युनिट खरेदी करण्याची संधी मिळू शकते. त्याच्या पुढील महिन्यात त्याच तारखेला शेअर बाजारात तेजी आल्यानंतर तुम्हाला केवळ 9 युनिट खरेदी करण्याची संधी मिळू शकते. म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या मदतीने 30 युनिट खरेदी करू शकता. थोडक्यात काय तर शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. (You too can become a millionaire after retirement; Here’s how to put money together)

इतर बातम्या

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

Photo: स्वप्नील जोशीने कोरोना परिस्थितीवरील भावनिक पत्रं वाचलं; अनेकांना अश्रू अनावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.