तुम्ही पण कराल जय-जयकार; 70 कर्मचाऱ्यांना केले करोडपती; आहेत कोण हे जय चौधरी

Jai Chaudhary SEO Zscaler : असा बॉस मिळणे सोपं नसतं. असा बॉस मिळायला भाग्य लागतं असं तुम्ही नक्की म्हणाल. कारण जय चौधरी यांनी त्यांच्या कंपनीतील 80 मधून 70 कर्मचाऱ्यांना करडोपती केले. दिवाळीला सूरतमधील काही हिरे व्यापारी जसे बोनस देतात. पण जय चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना कोट्याधीश केले आहे.

तुम्ही पण कराल जय-जयकार; 70 कर्मचाऱ्यांना केले करोडपती; आहेत कोण हे जय चौधरी
जय चौधरी यांच्यामुळे कर्मचारी करोडपती
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 5:08 PM

असा बॉस मिळायला भाग्य लागतं असं तुम्ही नक्की म्हणाल. कारण जय चौधरी यांनी त्यांच्या कंपनीतील 80 मधून 70 कर्मचाऱ्यांना करडोपती केले. दिवाळीला सूरतमधील काही हिरे व्यापारी जसे बोनस देतात. पण जय चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना कोट्याधीश केले आहे. भारतीय-अमेरिकन अब्जाधीश जय चौधरी हे पहिला स्टार्टअप विक्रीच्या तयारीत होते. त्यावेळी आपले काही खरं नाही, असं कर्मचाऱ्यांना वाटलं. पण त्यांना माहिती नव्हतं की मालक त्यांना ‘चौधरी’ करुन जाणार आहेत. त्यांना करोडपती करुन जाणार आहेत ते.

क्लाउड सिक्युरिटी कंपनीचे झेडस्केलरचे सीईओ (Zscaler) जय चौधरी यांनी असंच काहीसं काम केले आहे. त्यांनी जेव्हा त्यांचा स्टार्टअप विक्री केला, तेव्हा त्यांच्या 70 कर्मचाऱ्यांना करोडपती केले. अर्थात ही कंपनी विक्री करताना ती इतक्या लोकांचे भाग्य उघडेल असे त्यांच्या ध्यानी-‘मनी’ सुद्धा नव्हते.

90 च्या दशकात 65 वर्षांचे जय चौधरी यांनी SecureIT नावाची कंपनी सुरु केली होती. तेव्हा ही कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांनी सर्व पैसा लावला होता. जय चौधरी यांनी CNBC ला सांगितले की, गुंतवणूकदारांनी त्यांना कंपनीतील कर्मचाऱ्यांना इक्विटी (शेअर) देण्यास मंजूरी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना शेअर दिले होते.

हे सुद्धा वाचा

कर्मचारी झाले मालामाल

1998 मध्ये जेव्हा त्यांनी कंपनीची विक्री केली, त्यावेळी जय चौधरीच नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना जोरदार फायदा झाला. त्यांच्या Verisign स्टॉकची किंमत वधारली. त्यामुळे त्यांच्या 80 मधील 70 हून अधिक कर्मचारी करोडपती झाले. या कंपनीचे जवळपास 87.5 टक्के कर्मचारी झटक्यात करोडपती झाले. कर्मचाऱ्यांना कंपनीत हिस्सा देणे कधीही चांगले असते, त्यामुळे ते कंपनी वाढीसाठी रात्र अन् दिवस झटतात. कंपनीच्या फायदासाठी मेहनत घेतात, असे चौधरी सीएनबीसीसोबत बोलताना म्हणाले होते.

कर्मचाऱ्यांनी काय केले

अनेकांना प्रश्न पडला असेल की अचानक कोट्याधीश झालेल्या कर्मचाऱ्यांनी काय केले. तर त्याचे उत्तर पण जय चौधरी यांनी दिले आहे. त्यानुसार, कंपनीतील कर्मचारी यामुळे उत्साही होते. त्यावेळी इतकी मोठी रक्कम आपल्याला मिळले हे त्यांच्या गावी पण नव्हते. अनेक कर्मचाऱ्यांना नवीन घर, कार खरेदी केले. काहींनी इतर ठिकाणी गुंतवणूक केली. डॉट.कॉमचा फुगा फुटण्याअगोदर ज्यांनी पैशांचे नियोजन केले. त्यांचा मोठा फायदा झाला. पण ज्यांनी उशीरा शेअर विक्री केले, त्यांना मोठा फायदा झाला नाही. त्यांना नुकसान सहन करावं लागलं.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.