Youtube Income Tax : युट्यूबर्सला कमाईवर किती द्यावा लागतो टॅक्स? हा नियम माहिती आहे का?

Income Tax on Youtube : युट्यूब हे सध्या अनेकांसाठी कमाईचे साधन झाले आहे. युट्यूबर्स कमाई करत असले तरी त्यांना कर चुकवता येत नाही. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युट्यूबर्सला कमाईवर कर द्यावा लागतो. काय आहेत हे नियम, जाणून घ्या...

Youtube Income Tax : युट्यूबर्सला कमाईवर किती द्यावा लागतो टॅक्स? हा नियम माहिती आहे का?
किती द्यावा लागतो कर
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 3:19 PM

YouTube आता केवळ व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म उरला नाही. उलट कमाईचे एक मोठे साधन झाले आहे. या प्लॅटफॉर्मवर लोक विविध प्रकारचे कंटेंट टाकतात. त्यातून मोठा पैसा कमावतात. अनेक युट्यूबर्स जमके कमाई करत आहेत. पण याचा अर्थ त्या कमाईवर सरकार कर आकारत नाही, असे नाही. उत्पन्नाचे एक साधन वाढले असले तरी त्यावर प्राप्तिकर अधिनियम 1961 अंतर्गत कर द्यावा लागतो. काय आहे हा नियम?

कोट्यवधीची कमाई, असा आहे नियम

YouTube च्या माध्यमातून होणारी कमाई व्यावसायिक उत्पन्न गटात मोडते. जर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकूण उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर डिजिटल क्रिएटर्स विना लेखा परीक्षण करता आयटी रिटर्न भरू शकतो. एक कोटी रूपयांहून अधिकची कमाई असेल तर नियम 6A नुसार, लेखापरीक्षण, ऑडिट करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

या क्रिएटर्सला करावे लागते ऑडिट

Youtube वर ज्यांची कमाई एक कोटींहून अधिक आहे. त्यांना नियम 44AB अंतर्गत लेखापरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. हे काम लेखा परीक्षकाकडून, चार्टर्ड अकाऊंटंट करून करून घ्यावे लागते. एकूण उत्पन्नातून सर्व रक्कम कपात झाल्यावर जी रक्कम शिल्लक राहते. तिला निव्वळ करपात्र उत्पन्न म्हणतात.

जर एखाद्याचे कर दायित्व 10,000 रुपयांहून अधिक असेल तर त्याला आगाऊ कर भरावा लागेल. हा आगाऊ कर वर्षभरात चार वेळा जमा होतो. 15 जूनपर्यंत 15 टक्के, 15 सप्टेंबरपर्यंत 45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के आणि 15 मार्चपर्यंत 100 टक्क्यांपर्यंत कराचा भरणा करावा लागतो.

YouTube उत्पन्नावर GST

भारतात Youtube मधून उत्पनावर 18 टक्के दराने जीएसटी द्यावा लागतो. क्रिएटर्सला जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. त्याच्या चॅनलवर जाहिरातीतून होणाऱ्या कमाईवर जीएसटी प्रमाणे रिटर्न वेळोवेळी जमा करावा लागतो.

Youtube मधून कमाई करणार्‍याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तो क्रिएटर युनिक टॅक्स कन्सिडरेशनच्या परीघात येतो. म्हणजे त्याचे उत्पन्न आई-वडिलांच्या करामध्ये एकत्र न करता स्वतंत्र गृहित धरत कर लावण्यात येतो. युट्यूबमधून कमाई होत असेल तर तुम्हाला कराचा नियोजन पण करावे लागते.

मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.