TMC चा नवीन खेळाडू अधीर रंजन यांना धुळ चारणार? संपत्तीत तर 25 पट अधिक श्रीमंत

TMC Yusuf Pathan | युसूफ पठाण हा पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील लोकसभा मैदानात उतरला आहे. या मतदारसंघातूनच काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी पण उभे ठाकण्याची शक्यता आहे. युसूफच्या गोलदांजीवर ते आऊट होतात की पठाणची विकेट काढतात हे समोर येईलच.

TMC चा नवीन खेळाडू अधीर रंजन यांना धुळ चारणार? संपत्तीत तर 25 पट अधिक श्रीमंत
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 9:24 AM

नवी दिल्ली | 12 March 2024 : सर्वांचे अंदाज चुकवत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्वच लोकसभा जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला पण तिकीट दिले. तो बहरामपूर येथून नशीब आजमावत आहे. कदाचित याच लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी पण लढण्याची दाट शक्यता आहे. या मैदानात ते युसूफच्या गोलंदाजीवर आऊट होतात की पठाणची विकेट काढणार हे लवकरच समजेल. पण संपत्तीच्या बाबतीत युसूफ हा अधीर यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत असल्याचे चित्र आहे. त्याच्याकडे चौधरी यांच्यापेक्षा 25 पट अधिक श्रीमंत आहे. अधीर रंजन यांच्याकडे 2 कोटी रुपयांचा बंगला, 40 लाखांची व्यावसायिक आणि 6 कोटींची अकृषक जमीन आहे.

युसूफ इतक्या संपत्तीचा मालक

caknowledge.com नुसार, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याची एकूण संपत्ती 30 दशलक्ष डॉलर व 248 कोटी रुपये इतकी आहे. पठाणला सर्वाधिक कमाई ही क्रिकेटमधून होते. वार्षिक 20 कोटी रुपये क्रिकेटमधून येतात. त्याच्याकडे 6 कोटींहू अधिकची आलिशान इमारत आहे. याठिकाणी तो त्याचा भाऊ इरफान आणि कुटुंबासह राहतो. दोन्ही भावांनी हे घर 2008 मध्ये 2.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

हे सुद्धा वाचा

2011 विश्वचषकात भारतीय टीममध्ये

41 वर्षाचा युसूफ पठाण पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. पठाण याने 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. पठाण टी20 वर्ल्डकप (2007) आणि 2011 मधील टीमचा खेळाडू होता. त्याने भारतासाठी 57 एकदिवसीय सामन्यात 810 धावा काढल्या. तर टी20 मध्ये 236 धावा आहेत. एकदिवसीय सामन्यात 2 शतक आणि 3 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. आता तो पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीसाठी कसून तयारीला लागला आहे.

अधीर रंजन चौधरी इतके श्रीमंत

myneta नुसार, काँग्रेसचे दिग्गज नेता अधीर रंजन चौधरी यांची एकूण संपत्ती 10,13,15,437 रुपये आहे. त्यांच्या डोक्यावर 85 लाख रुपयांचे कर्ज आहे. बँकेत 17 लाखांपेक्षा अधिकची ठेव आहे. एलआयसीमध्ये 10 लाखांहून अधिकची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे 23 लाख रुपयांची कार आणि 26 लाखांचे दागिने आहेत. युसूफच्या तुलनेत त्यांची संपत्ती कमी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.