12 लाखांच्या पगारावर भरु नका टॅक्स, या फॉर्म्युल्यामुळे वाचेल मोठा पैसा

Zero Income Tax | पगारादारांना आता आयकर कसा वाचवावा याची चिंता लागली असेल. तुम्हाला एचआर डिपार्टमेंटकडून एक मेल पण आला असेल. त्यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी गुंतवणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. तुम्हाला जर गलेलठ्ठ पगार असेल तर 12 लाखांच्या पगारावर तुम्हाला एक नया पैसा पण आयकर भरण्याची गरज नाही.

12 लाखांच्या पगारावर भरु नका टॅक्स, या फॉर्म्युल्यामुळे वाचेल मोठा पैसा
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 3:15 PM

नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट सादर करतील. अर्थात नोकरदारांना आयकरात किती सवलत, सूट मिळते हे महत्वाचे असते. कारण उत्पन्नावर जेवढा कर वाचवता येईल, तितकीच चाकरमान्यांना बचत करता येते. तुम्हाला एचआर विभागाने एक मेल पाठवला असेल. त्यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी गुंतवणूकीसंबंधीचे पुरावे मागितले असतील.या एका ट्रिकमुळे तुम्हाला 12 लाखांच्या उत्पन्नावर एक रुपया पण कर भरण्याची गरज नाही.

असा वाचेल 12 लाखांच्या पगारवर कर

जर तुमचा पगार वार्षिक 12 लाख रुपये असेल तर या स्टेप्स फॉलो करुन तुम्हाला कराची रक्कम वाचवता येईल. त्यामुळे तुम्हाला इनकम टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या एचआर विभागाची मदत घेऊ शकता. मुख्यतः हाऊसिंग रेंट अलाऊन्स (HRA), लीव ट्रॅ्व्हल अलाऊंज (LTA), हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स यासारख्या सुविधांचा यामध्ये वापर करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

सॅलरी स्ट्रक्चर कॅलक्युलेशन

सॅलरी 12 लाख रुपये असेल तर तुम्हाला तुमच्या पगाराचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी HRA 3.60 लाख रुपये, LTA 10,000 रुपये आणि टेलिफोनचे बिल 6,000 रुपये असायला हवे. एकूण वेतनावर तुम्हाला डिडक्शनचा असा लाभ मिळेल.

  1. आयकर विभागाच्या कलम 16 अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये
  2. प्रोफेशनल टॅक्सपासून सवलत 2,500 रुपये
  3. कलम 10 (13A) अंतर्गत HRA 3.60 लाख रुपये
  4. कलम 10 (5) अंतर्गत LTA 10,000 रुपये
  5. हा एकूण खर्च जोडल्यास कर सवलतीचा पगार 7 लाख 71 हजार 500 रुपये असेल
  6. कलम 80C च्या अंतर्गत (LIC, PF, PPF, मुलांची ट्यूशन शुल्क) 1.50 लाख रुपये
  7. कलम 80CCD च्या अंतर्गत टियर-1 अंतर्गत NPS वर 50,000 रुपये
  8. 80D अंतर्गत , पत्नी आणि मुलांसाठी आरोग्य विम्यापोटी 25,000 रुपये
  9. पालकांच्या आरोग्य विम्यापोटी 50,000 रुपयांची सवलत

नाही द्यावा लागणार आयकर

सर्व डिडक्शन आणि सवलत जोडल्यास तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 4,96,500 असेल. त्यानंतर तुमची करपात्र कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. त्यावर करदात्याला कोणताही कर द्यावा लागत नाही. हाच तो फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुम्हाला 12 लाख रुपयांची कमाई कर मुक्त करता येईल.

HR मनाई केल्यास?

जर तुमच्या कंपनीचे एचआर सॅलरी स्ट्रक्चर टॅक्स फ्रेंडली करण्याच्या तयारीत नसेल तर तुम्हाला दुसरा पर्याय समोर ठेवावा लागेल. त्याआधारे तुम्ही उत्पन्न करमुक्त करु शकता.

  1. 2 लाख रुपये होम लोनवर सवलत
  2. 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सवलत
  3. एनपीएस टीयर 1 खात्यावर 50,000 रुपयांची सूट
  4. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये
  5. पत्नी, मुलं आणि स्वतःचा आरोग्य विमा 25,000 रुपये
  6. आई-वडिलांचा आरोग्य विमा 50,000 रुपये
  7. बचत खात्यावर 10,000 रुपयांची सवलत
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.