Nikhil Kamath : मन जिंकलस भावा! झिरोधाचे निखिल कामत यांचा निर्णय जगावेगळा

Nikhil Kamath : झिरोधा तर सर्वांनाच माहिती आहे. निखिल कामत हा त्याचा मालक, आता या पठ्ठ्यानं असं काम केलंय की, तुम्हाला त्याचा हेवा वाटेल..

Nikhil Kamath : मन जिंकलस भावा! झिरोधाचे निखिल कामत यांचा निर्णय जगावेगळा
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 2:42 PM

नवी दिल्ली : भारतात सर्वात आगेकूच करणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधा (Zerodha) सर्वांनाच माहिती आहे. तर निखिल कामत या कंपनीचे सह संस्थापक आहेत. निखिल (Nikhil Kamath) त्याच्या साधेपणा, मृदू स्वभाव, कर्मचाऱ्यांसाठी हिताचे निर्णय यासाठी ओळखल्या जातो. त्याचा भाऊ नितीन पण एकदम ग्रेट पर्सनालिटी. तर निखिल कामत यांनी समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवण्याचा संकल्प सोडला आहे. सध्या जो तो पैशांच्या मागे धावत असताना निखिलचा हा निर्णय सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारा तर आहेच, पण हेवा वाटावा असाच आहे.

काय केलं खास तर Zerodhaचे सह संस्थापक निखिल कामत त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान करणार आहे. जगातील अब्जाधीश आणि मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचा ‘द गिव्हिंग प्लेज’ (The Giving Pledge) अशी एक मोठी संस्था आहे. ही जगभरातील लोकांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी काम करते. या क्लबमध्ये निखिल कामथ सहभागी झाला आहे. अझीम प्रेमजी, किरण मुझुमदार-शॉ आणि रोहिणी, नंदन नीलेकणी हे यापूर्वीच त्यात सहभागी झाले आहेत. आता चौथा भारतीय म्हणून निखिलने मान उंचावली आहे. या क्लबमधील दिग्गज त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजासाठी दान करतात.

सर्वात तरुण दानशूर उद्योजक ‘माझं वय कमी असलं तरी जगाला सकारात्मक काही देण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. समताधिष्ठित समाज स्थापन्यासाठी द गिव्हिंग प्लेजच्या मिशनसोबत माझी मतं आणि मूल्य यांचा ताळमेळ बसतो’. निखिल कामत यांनी त्यांचं मत या शब्दात व्यक्त केलं. या क्लबसोबत जोडल्या गेलेला निखिल हा सर्वात तरुण भारतीय उद्योजक ठरला आहे. 36 वर्षांचा निखिल शेअर बाजारात अत्यंत सक्रिय आहे. त्याने भावासोबत मिळून या क्षेत्रात अगदी कमी वयात सुरुवात केली. तो जगाच्या श्रीमंतांच्या यादीत सहभागी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

शाळा लवकर सुटली निखिल स्कूल ड्रॉपआऊट आहेत. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर इथंपर्यंत मजल मारली. झिरोधाचे सहसंस्थापक निखिल यांनी कष्टाच्या जोरावर मोठी झेप घेतली. त्यांची ब्रोकरेज फर्मही देशातील सर्वात झपाट्याने वाढणारी ब्रोकिंग कंपनी आहे. 17 वर्षांचे असतानाच त्यांनी नोकरी सुरु केली. एका कॉल सेंटरमध्ये ते काम करत होते. त्यावेळी त्यांना 8000 रुपये पगार होता.

झिरोधाची सुरुवात 2010 साली दोन्ही भावांनी मिळून झिरोधाची स्थापना केली. हा ब्रँड उभा करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. आज जरी अब्जाधीश झालो असलो तरी आजही तेवढाच वेळ काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.