Zomato Layoff: झोमॅटो करणार कर्मचाऱ्यांची छाटणी? कोणत्या श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?
जागतिक मंदीचा परिणाम भारतीय व्यवसायांवरही दिसायला लागला आहे. झोमॅटोमधून कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, जागतिक मंदीचा (Global recession) परिणाम भारतातील खाजगी क्षेत्रातही दिसू लागला आहे. ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटानंतर आता फूड एग्रीगेटर झोमॅटोनेही कर्मचाऱ्यांची छाटणी (Zomato Layoff) केल्याचे समोर आले आहे. झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या 3 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. फूड एग्रीगेटर ॲप झोमॅटोने जवळपास 100 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी कंपनीच्या उत्पादन, टेक, कॅटलॉग आणि मार्केटिंग अशा विविध विभागांशी संबंधित आहेत. कंपनीच्या एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे 3 टक्के कामगारांना कामावरून काढून टाकायचे आहे.
झोमॅटोमधील कपातीची ताजी बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनात सातत्याने राजीनामे होत आहेत. गेल्या शुक्रवारीच कंपनीचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी आपले पद सोडले. गेल्या काही दिवसांत झोमॅटोच्या व्यवस्थापनातील हा तिसरा राजीनामा होता. त्याच आठवड्यात, कंपनीचे नवीन उपक्रम प्रमुख राहुल गंजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय इंटरसिटी लिजेंड सर्व्हिसेसचे प्रमुख सिद्धार्थ झंवर यांनी आठवड्यापूर्वी कंपनी सोडली.
फूड-ऑर्डरिंग ॲप झोमॅटोने नियमित कामगिरी-आधारित टाळेबंदीचा भाग म्हणून आपल्या कर्मचार्यांपैकी 3 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. आमचे 3 टक्क्यांहून कमी कर्मचारी नियमित कर्मचार्यांच्या कामगिरीवर मंथन करत आहेत, आणखी काही नाही, किमान 100 कर्मचार्यांवर परिणाम झाला आहे, ही प्रक्रिया गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे.
खराब कामगिरी करणार्यांना दाखविणार घरचा रास्ता
Zomato चे संस्थापक आणि CEO दीपेंद्र गोयल यांनी अलीकडेच सूचित केले होते की, कंपनीच्या काही सेगमेंटमध्ये खराब कामगिरी करणाऱ्यांना कंपनी घरचा रस्ता दाखविणार आहे. वास्तविक, Zomato सध्या अनेक मोठ्या बदलांमधून जात आहे. अलीकडेच, कंपनीने घोषणा केली होती की यूएईमध्ये त्यांची डिलिव्हरी सेवा बंद केली जाईल. तिथे राहणाऱ्या लोकांचे ऑर्डर दुसऱ्या ॲपवर ट्रान्सफर केले जातील, असे सांगण्यात आले.
सहसंस्थापकही देणार राजीनामा
झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी काल राजीनामा जाहीर केला आहे. मार्केटला दिलेल्या नोटमध्ये, त्यांनी एक निरोपाचा संदेश जोडला, ज्यामध्ये त्याने झोमॅटोमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार राहतील असे सांगितले. Zomato ने गेल्या गुरुवारी दुसऱ्या तिमाहीत कमी तोटा नोंदवला. ऑनलाइन ऑर्डरमध्ये सतत वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी एकत्रित निव्वळ तोटा 2.51 अब्ज रुपये होता, जो एका वर्षाच्या आधीच्या 4.30 अब्ज रुपयांच्या तुलनेत होता. त्याच वेळी, ऑपरेशन्समधील महसूल 10.24 अब्ज रुपयांवरून 16.61 अब्ज रुपयांपर्यंत वाढला आहे.
मंदीमुळे टाळेबंदी
जागतिक मंदीमुळे आयटीसह इतर क्षेत्रात टाळेबंदी होत आहे. यापूर्वी, फेसबुकची मूळ कंपनी – मेटाने 11000 हून अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची चर्चा केली होती. याशिवाय ॲमेझॉन, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्या टाळेबंदी करत आहेत. भारतातील Byju’s आणि Unacademy सारख्या स्टार्टअप्सनीही टाळेबंदी जाहीर केली आहे.