भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेज, न्यासा कंपनीविरोधात तक्रार दाखल

| Updated on: Oct 26, 2021 | 9:20 PM

आरोग्य विभागाच्या गड ड संवर्गासाठी भरती परीक्षा येत्या 31 तारखेला होणार आहे. मात्र, परीक्षेसाठी वितरीत केलेले हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याची माहिती विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षेचं कंत्राट दिलेल्या न्यासा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेज, न्यासा कंपनीविरोधात तक्रार दाखल
PUNE APP
Follow us on

पुणे : आरोग्य विभागाच्या गड ड संवर्गासाठी भरती परीक्षा येत्या 31 तारखेला होणार आहे. मात्र, परीक्षेसाठी वितरीत केलेले हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याची माहिती विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षेचं कंत्राट दिलेल्या न्यासा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने पुण्यातील डेक्कन पोलिसांत ही दक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांवरही गुन्हा दाखल करावा असं आपने म्हटलंय.

न्यासा कंपनीवर कारवाई करा

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी 24 ऑक्टोबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेदरम्यान राज्यात अनेक शहरांत चांगलाच गोंधळ उडाला. प्रवेशपत्र मिळण्यापासून ते प्रत्यक्ष परीक्षा देताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऐन परीक्षेमध्ये त्रास सहन करावा लागल्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात होता. याच सावळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठा गोंधळ उडाला आहे. आरोग्य विभागाच्या गड ड संवर्गासाठीची भरती परीक्षा येत्या 31 तारखेला होणार आहे. मात्र परीक्षेसाठी वितरीत केलेले प्रवेशपत्र ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे सांगण्यात आले आहे. याच कारणामुळे आम आदमी पक्षाने न्यासा या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या सर्व गोंधळाला न्यासा कंपनी जबाबदार असल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे. आपने डेक्कन पोलिसात न्यासा कंपीनविरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आरोग्य भरती परीक्षेमध्ये महाराष्ट्रभर गोंधळ

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिकमध्येही परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालेला होता. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला होता. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. विद्यार्थी संख्येच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावादेखील विद्यार्थ्यांनी केला होता.

इतर बातम्या :

नवाब मलिक गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, समीर वानखेडेंवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई होणार?

Mumbai Local Train | लोकल प्रवासाच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्देश

VIDEO: एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं, वकिलाचा धक्कादायक दावा; वाचा सविस्तर