हवाई दलात जायचंय?, ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालंय; तुम्हीही करा ट्राय

भारतीय हवाई दलात 336 कमिशन्ड अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे. 263 पुरुष आणि 73 महिला उमेदवारांसाठी ही पदे उपलब्ध आहेत. एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (एएफसीएटी) अर्ज प्रक्रिया 2 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. परीक्षेची तपशीलवार माहिती आणि पात्रता निकष अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

हवाई दलात जायचंय?, ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालंय; तुम्हीही करा ट्राय
हवाई दलात जायचंय?, ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालंय; तुम्हीही करा ट्राय
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 9:59 PM

ज्यांना एकदा तरी हवाई दलात काम करण्याची इच्छा आहे, अशांसाठी एक मोठी बातमी आहे. हवाई दलात करण्याची तुम्हालाही संधी मिळू शकते. हवाई दलातील कमिशन्ड ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. ही एकूण 336 पदे आहेत. यात पुरुषांची 263 तर स्त्रियांची 73 पदे भरली जाणार आहेत. एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) ऑनलाइन घेतली जाईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 रात्री 11:30 आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल आणि केरळमधील त्रिवेंद्रम, कोच्ची, त्रिशूर, कन्नूर या केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

रिक्त पदांची माहिती

  • फ्लाईंग ब्रांच – 30 पदे रिक्त
  • टेक्निकल ब्रांच (एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर) – 189 पदे रिक्त
  • नॉन-टेक्निकल ब्रांच (विपन्स सिस्टिम्स, अॅडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, अकाउंट्स, मेटरिओलॉजी) – 117 पदे रिक्त

पात्रता:

  • बीटेक (B.Tech) विद्यार्थ्यांसाठी आणि इतर पदवीधरांसाठीही कमिशन्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करता येईल. अॅडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, अकाउंट्स, एज्युकेशन या विभागांना सोडून इतर विभागांमध्ये अर्ज करणाऱ्यांना प्लस टू मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी शारीरिक आणि मेडिकल निकषांची योग्य तपासणी करूनच अर्ज करणे आवश्यकता आहे.
  • प्रशिक्षण कालावधी दरम्यान किंवा कोर्स सुरू असताना उमेदवार अविवाहित असावे.

परीक्षेची माहिती:

  • 2 तासांच्या परीक्षेत इयत्ता 10 वीच्या स्तरावर न्यूमेरिकल एबिलिटी, पदवी स्तरावर इंग्रजी, मिलिटरी इंटरेस्ट, सामान्य ज्ञान,आणि तर्कशक्ति विषयांवर 100 प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी 3 गुण दिले जातील आणि चुकीच्या उत्तरावर 1 गुणाची नाकारात्मक मार्किंग असेल.
  • ऑनलाइन टेस्ट पास करणाऱ्यांना एअरफोर्स सेलेक्शन बोर्डच्या 5 दिवसांच्या मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.

अर्ज करण्याची पद्धत:

  • फ्लाईंग ब्रांच उमेदवारांना पायलट सिलेक्शन टेस्ट देखील देणे आवश्यक आहे. NCC स्पेशल एंट्रीच्या उमेदवारांना थेट एअरफोर्स सेलेक्शन बोर्डकडून टेस्टसाठी बोलावले जाईल.
  • अर्ज शुल्क 550 रुपये आणि जीएसटी आहे. NCC स्पेशल एंट्रीसाठी अर्ज शुल्क नाही.
  • अर्ज https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या वेबसाइट्सवर जाऊन करता येतील. अर्ज कसा करावा याची अधिक माहिती अधिकृत सूचनेत देण्यात आली आहे.
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.