Bank of Maharashtra Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रात व्हा अधिकारी, पदवीसह अशी पात्रता हवी
Bank of Maharashtra Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रात अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. या पदासाठी पगारही चांगला आहे. त्यामुळे उमेदवारांना भविष्याची चिंता राहणार नाही.
नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असेल तर ही संधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. बँक ऑफ महाराष्ट्रात (Bank Of Maharashtra Recruitment 2023) तुम्हाला अधिकारी होण्याचे स्वप्न साकारता येईल. बँकेने विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. भरतीची जाहिरात पण बँक ऑफ महाराष्ट्राने प्रसिद्ध केली आहे. या पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांना दोन पद्धतीने या अधिकारी पदासाठी अर्ज करता येईल. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्जाचे शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज पाठविण्याचा पत्ता काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील, नाही का? मग वाट कशाला पाहता, व्हा की अधिकारी..
या पदासाठी होईल भरती
अधिकारी (स्केल- 1 आणि स्केल- 2), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थतज्ज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखिम अधिकारी
एकूण जागा किती
बँक ऑफ महाराष्ट्राने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहे. एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थतज्ज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखिम अधिकारी या पदासाठी अर्ज करता येईल. एकूण 416 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अशी आहे शैक्षणिक पात्रता
1) अधिकारी (स्केल- 1) – कोणत्याही शाखेतील पदवी
2) अधिकारी (स्केल- 2) – कोणत्याही शाखेतील पदवी
3) एजीएम – हे व्यावसायिक पद आहे. त्यासाठी उमेदवाराकडे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे. CA/ CFA/ CMA/ रिस्क मॅनेजमेंट/ फायनान्स/ यासारखी अतिरिक्त पात्रता ग्राह्य धरण्यात येईल.
4) मुख्य व्यवस्थापक – आयटी/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. डेटा सायन्स/ डेटा ॲनालिटिक्स आणि एमबीए/ डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.ए (अर्थशास्त्र) पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
5) अर्थशास्त्रज्ञ : उमेदवार अर्थशास्त्राचा जाणकार असावा. त्याने मान्यता प्राप्त विद्यापीठ, संस्थेतून 60 टक्के गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे.
6) मेल प्रशासक : B.Tech/ B.E उमेदवार असावा.
7) उत्पादन समर्थक प्रशासक : B.Tech/ B.E उमेदवार असणे आवश्यक.
8) मुख्य डिजिटल अधिकारी : उमेदवार संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर असावा. एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.
9) मुख्य जोखिम अधिकारी : संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान शाखेतील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण उमेदवार, अभियांत्रिकी पदवी/ एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असलेला उमेदवार असावा.
वेतन किती मिळणार
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवाराला देय वेतन, भत्ते लागू आहेत. उमेदवारांना 48,170 रुपये ते 1,00,380 रुपये पगार मिळतो.
वयाची अट काय
त्या त्या पदानुसार 25 ते 60 वर्षे वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल. यामध्ये अनुसूचित जाती, जमातींना 5 वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल.
अर्जासाठी इतके शुल्क
या पदासाठी खुला, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना 1180 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तर एसी, एसटी आणि पीडब्ल्यूईडी उमेदवारांना 118 रुपये शुल्क लागेल.