Bank of Maharashtra Recruitment 2021 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी

Bank of Maharashtra Recruitment 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमधील जनरल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2021 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
ministry of defence recruitment 2021
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 11:29 AM

Bank of Maharashtra Recruitment 2021 मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रमधील जनरल ऑफिसर पदावर भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जनरल ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती घेऊन अर्ज करावा. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकूण 150 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी 6 एप्रिल हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना देशभरात बँकेच्या कोणत्याही शाखेत शाखा प्रबंधक अधिकारी म्हणून काम करावे लागेल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ वर भेट द्यावी आणि अर्ज करावा. (Bank of Maharashtra Recruitment for the post of General Officer last day for apply)

Bank of Maharashtra Recruitment 2021 :आरक्षणनिहाय पदसंख्या

एकूण – 150 पोस्ट एससी – 22 एसटी – 11 ओबीसी – 40 ईडब्ल्यूएस -15 खुला – 62

या तारखा ठेवा लक्षात

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 22 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज आणि शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2021

शैक्षणिक पात्रता

जनरल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 60% गुणांसह बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळाकडून मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून प्रोफेशनल कोर्स केलेला असला पाहिजे. याशिवाय कोणत्याही व्यावसायिक बँकेत क्रेडिट एरिया, ब्रांच अधिकारी म्हणून तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचवेळी या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे.

अर्जाचं शुल्क

खुल्या, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 परीक्षा सुल्क भरावे लागेल. तर,एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 118 रुपये शुल्क भरावे लागेल. तर दिव्यांग आणि महिला उमेदवारांना कसलेही शुल्क भरावे लागणार नाही.

Bank of Maharashtra Recruitment 2021 : अशी असेल निवड प्रक्रिया

जनरल ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड आयबीपीएसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या व्यतिरिक्त, भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात.

संबंधित बातम्या:

Government Job: JPSC नं 252 पदांसाठी काढली भरती; आजच अर्ज करा(Opens in a new browser tab)

Air India Recruitment 2021: परीक्षा न देता मिळवा एअर इंडियामध्ये नोकरी, असं करा अप्लाय(Opens in a new browser tab)

(Bank of Maharashtra Recruitment for the post of General Officer last day for apply)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.