एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 161 पदांवर होणार भरती, परीक्षेची तारीख जाहीर
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. गट अ आणि गट ब संवर्गासाठी एमपीएससी आयोगाच्या वतीने जाहीरात काढण्यात आली आहे. एकूण 161 पदांसाठी भरती होणार आहे.
मुंबई : एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. गट अ आणि ग ब संवर्गासाठी एमपीएससी आयोगाच्या (MPSC Commission) वतीने जाहीरात काढण्यात आली आहे. ही जाहीरात अ आणि ब गटातील मिळून एकूण 161 पदांसाठी काढण्यात आली आहे. या जाहीरातीनुसार (Advertising) या जागांसाठी 21 ऑगस्टला पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा एकूण 161 पदांसाठी होणार आहे. यामध्ये सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) साठी एकूण 9 जागा आहेत. मुख्याधिकारी नगरपालिका, परिषद गट अ साठी एकूण 22 जागा आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ साठी एकूण 28 जागा आहेत. सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी एकूण दोन जागा आहेत. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बसाठी एकूण तीन जागा भरण्यात येणार आहेत. तसेच कक्ष अधिकारी गट बसाठी एकूण पाच जागा भरण्यात येणार आहेत. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट बसाठी एकूण चार जागांवर भरती होणार आहे. त्याच प्रमाणे निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संसथा तसेच तत्सम 88 जागांवर उमेदवारांची भरती परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा
या सर्व जागांसाठी पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. पूर्व परीक्षेतून विविध निकषांच्या आधारे उमेदवाराची निवड होणार आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 21 व 22 जानेवारी 2023 रोजी होऊ शकते, अशी माहिती आयोगाच्या वतीने देण्या आली आहे. मुख्य परिक्षेतून अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदसंख्या व आरक्षणात बदल
दरम्यान पदसंख्या व आरक्षाणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता असल्याचे देखील या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये म्हटले आहे. . महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 161 पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. ही भरती गट अ आणि गट ब वर्गासाठी असणार आहे. कोरोना काळानंतर आयोगातर्फे मोठ्या पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.