IBPS RRB Recruitment : बँकेत व्हा अधिकारी, 8000 हून अधिकची पदभरती, रग्गड मिळवा पगार

IBPS RRB Recruitment : तुमचे बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. बँकेत 8000 हून अधिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

IBPS RRB Recruitment : बँकेत व्हा अधिकारी, 8000 हून अधिकची पदभरती, रग्गड मिळवा पगार
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 7:45 PM

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) अधिकारी श्रेणीतील I, II, III आणि कार्यालयीन सहायक (बहुविविध) या पदासाठी मोठ्या प्रमाणात पद भरती होणार आहे. तुम्ही या पद भरतीसाठी पात्र असाल तर लागलीच अर्ज करा. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. या पदासाठी अंतिम मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. सध्या या पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2023 रोजी आहे. ही पदभरती (Recruitment ) विभागीय ग्रामीण बँकांसाठी होत आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज आईबीपीएस आरआरबीच्या या पदासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यासाठी उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. ibps.in या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. इतर पद्धतीने पाठविलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

अशी होईल निवड या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात असेल. या परीक्षेची तारीख अजून पण स्पष्ट नाही. या परीक्षेच्या लेटेस्ट अपडेटसाठी वेळोवेळी या अधिकृत वेबसाईट चेक करत राहा.

हे सुद्धा वाचा

किती भरावे लागेल शुल्क या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून ऑफिसर ग्रेड I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) या पदासाठी 8000 हून जणांची निवड करण्यात येणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांना या परीक्षेसाठी 850 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएक्सएसएम उमेदवारांना या परीक्षेसाठी 175 रुपये शुल्क अदा करावे लागेल.

असा करा अर्ज

  1. या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जा
  2. या संकेतस्थळावर होमपेजवर Apply वर क्लिक करुन अर्ज भरता येईल
  3. नवीन पेज उघडेल. या पेजवर अर्ज करण्यासाठीचा अर्ज देण्यात येईल, तो भरा
  4. त्यानंतर अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्जासोबत शुल्क ही अदा करा
  6. सर्वात शेवटी सबमिटवर क्लिक करा, या अर्जाची प्रिंट काढून ठेवा

IBPS RRB इतका पगार IBPS RRB अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते. पदानुसार हे वेतन असते. जबाबदारीनुसार वेतनासह उमेदवारांना अनुषांगिक लाभ देण्यात येतात.

IBPS RRB भत्ते आणि लाभ महागाई भत्ता (DA) : केंद्र सरकारकडून बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना IBPS RRB PO वा लिपिकाला मुळ वेतनावर 46.5% इतका महागाई भत्ता मिळता. डीएमध्ये दर 3 महिन्यानंतर बदल होतो.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.