भाऊ आर्मीत गेला, उरीत हल्ला झाला; दिव्या मिश्रा यांनी ठरवलं ध्येय आयएएसचं
दिव्या मिश्रा या कानपूरच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे आईवडील शिक्षक होते. घरी अभ्यासाचे वातावरण होते. दिव्या यांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात उन्नाव जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयातून केली.
नवी दिल्ली : आयएएस दिव्या मिश्रा (Divya Mishra ) यांचा भाऊ आर्मीत (INDIAN ARMY) गेला. त्यामुळे दिव्या यांनी सिव्हील सर्व्हिस जाईन करण्याचा निश्चय केला. परंतु, उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने दिव्या मिश्रा यांचा निश्चय आणखी दृढ झाला. दिव्या मिश्रा यांनी म्हटलं की, देशातच सेवा करू इच्छितात. दरवर्षी लाखो विद्यार्थी सिव्हील सर्व्हिसची परीक्षा देतात. परंतु, या परीक्षेत मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात. मेहनत आणि जिद्द याशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण करणे कठीण असते. तरीही दिव्या मिश्रा यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच इंडियन आर्मी आणि उरी हल्ल्यामुळे दिव्या यांना आयएएस बनण्यास प्रेरणा मिळाली.
दिव्या मिश्रा यांचा भाऊ आर्मीत जाणार असल्याने त्यांनी सिव्हील सर्व्हिस जॉईन करण्याचा विचार केला होता. परंतु, उरीतील दहशतवादी हल्याने त्यांचा इरादा पक्का केला.
देशप्रेमाची भावना
आयएएस दिव्या मिश्रा यांनी नुकतीच एक मुलाखत झाली. त्यात त्या म्हणतात, माझ्या भावाची निवड भारतीय सैन्यात झाली. आता तो लेफ्टनंट या पदावर आहे. आमच्या कुटुंबात कुणीही डिफेन्स फोर्समध्ये जाऊ शकला नाही. भाऊ तिकडे गेल्यामुळं देशसेवेची भावना बळकट झाली. मध्यंतरी उरीत हल्ला झाला. माझ्या मनात देशाप्रती वेगळीच भावना निर्माण झाली. त्यामुळे सिव्हील सर्व्हिसमध्ये येण्याचे निश्चित केले. कारण मीही माझ्या पद्धतीने देशसेवा करू इच्छित होती.
कोण आहे दिव्या मिश्रा
दिव्या मिश्रा या कानपूरच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे आईवडील शिक्षक होते. घरी अभ्यासाचे वातावरण होते. दिव्या यांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात उन्नाव जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयातून केली. बिटेक केल्यानंतर तीन वर्षे कंपनीत नोकरी केली.
दिव्या यांना दहावीत ९६ टक्के गुण होते. तर बारावीत ९२ टक्के गुण मिळाले. आईआयईएममधून पीएचडी केलं आहे. त्यांचंच नव्हे तर कुटुंबीयांचं स्वप्न हे आयएएस बनण्याचं होतं. ते स्वप्न खरं ठरलं. त्यासाठी परिश्रम करावे लागले. पहिल्या, दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या.