चंद्रावर जाणार की मंगळावर? इस्रोत मेगा भरती, पोरांना आजच अर्ज करायला सांगा
भारताने चांद्रयान-3 मोहीमेत जगाला चकीत केले आणि चंद्राच्या दक्षिण गोलार्धात सॉफ्ट लॅंडींग करुन पहिला देश झाला. आता अंतराळ संशोधनासाठी यंदा सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे.
इस्रो सारख्या देशातील सर्वोच्च संस्थेत काम करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तर तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्था इ्स्रोत विविध पदासाठी भरती होणार आहे. यात मेडीकल ऑफीसर, सायटिस्ट इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट आणि ड्राफ्ट्समनसह अन्य पदाचा समावेश आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट isro.gov.in वर अर्ज करण्याची गरज आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. लवकर अर्ज करावा…
शैक्षणिक अर्हता
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता यासाठी दिली आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या संदर्भातील नोटीफिकेशन आवश्यक वाचावे.ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सुट दिलेली आहे. एससी, एसटी उमेदवारासाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
विविध पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा
1. मेडिकल ऑफिसर (एसडी)- 18 ते 35 वर्षे
2. मेडिकल ऑफिसर (एससी )- 18 ते 35 वर्षे
3. साइंटिस्ट इंजिनियर (एससी)- 18 से 30 वर्षे
4. टेक्निकल असिस्टंट- 18 ते 35 वर्षे
5. सायंटिफिक असिस्टेंट- 18 ते 35 वर्षे
6. टेक्निशियन (बी)- 18 ते 35 वर्षे
7. ड्राफ्ट्समन (बी)- 18 ते 35 वर्षे
8. असिस्टंट (ऑफिशियल भाषा )- 18 ते 28 वर्षे
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 21,700 रुपये ते 2,08,700 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे
अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.