मुंबई : कोरोनाचं संकट जसं जसे कमी होत जातंय, तशा अनेक सरकारी नोकऱ्यांचीही संधी उपलब्ध होत आहे. आता ठाकरे सरकारच्या आरोग्य विभागात बंपर भरती काढण्यात आलीय. राज्याच्या आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांसाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय. तसेच या संबंधीची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीय.
विशेष म्हणजे आरोग्य विभागातील ही भरती ड गटातील 3 हजार 466 जागांसाठी असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमधून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
या भरती प्रक्रियेमधून अहमदनगर, धुळे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, परभणी, जालना, सांगली, रत्नागिरी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नंदुरबार, बुलडाणा, नांदेड, बीड, अकोला, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.
आयडीबीआय बँकेने 2021 मधील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑगस्ट पासून झाली असून अखेरचा दिवस 18 ऑगस्ट आहे. 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या
येत्या तिमाहीत 900 लोकांना नोकरी देणार ही कंपनी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर
umper recruitment for 3 thousand 466 posts in the health department, apply and get a job