CBSE 10th 12th Results 2022 Live Updates: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ (CBSE 10th 12th Results 2022 Live Updates) आज जाहीर होणं अपेक्षित आहे. बोर्डाने मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत सूचना शेअर केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, आज नोटीस शेअर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईने बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षांचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी आणि शाळांना सात महिन्यांच्या सलग परीक्षेच्या वेळापत्रक दिले, ज्यात दोन बोर्ड, दोन प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल्सचा समावेश आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टर्म-1 मध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यानंतर सीबीएसईला निकाल (CBSE Results) जाहीर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in जाहीर केला जाईल.
या खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइट्स आहेत, जिथे विद्यार्थी त्यांचे सीबीएसई इयत्ता 10 वी, 12 वी चा निकाल 2022 तपासू शकतील.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाच्या घोषणेच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती नसताना विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करणे खूप कठीण जात असले तरी विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी आताच तयार आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख तपशील आवश्यक असतील.
बारावीचे विद्यार्थी आपल्या सीबीएसईच्या निकालाबद्दल खूप अस्वस्थ आहेत आणि चिंताग्रस्त आहेत कारण त्यांना अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा आहे आणि विद्यापीठांनी यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश आधीच सुरू केले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. परंतु सीबीएसईच्या निकालानंतर प्रवेश सुरू करावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनी सर्व उच्च शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना केले आहे.
सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहीर होईल अशी अपेक्षा आहे, पण अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधील प्रवेशाबाबत अत्यंत काळजीत आणि चिंतेत असलेल्या सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण सीबीएसईच्या निकालाच्या घोषणेनंतर प्रवेशाची तारीख पुन्हा निश्चित करावी, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अध्यक्षांनी सर्व विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांना केले आहे.
सीबीएसईच्या निकालाला विलंब नाही. सीबीएसईच्या परीक्षा 15 जूनपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर तपासणीसाठी 45 दिवस लागतात. मी कालच सीबीएसई (अधिकाऱ्यांशी) बोललो आणि निकाल वेळेवर येईल.
– केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान