CBSE 10th Results 2022 live: निकाल लवकरच…प्रवेशपत्र काढून ठेवा! रोल नंबर जन्मतारीख लक्षात ठेवा…

| Updated on: Jul 15, 2022 | 9:25 PM

CBSE 10th Results 2022 live updates in Marathi: विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील.

CBSE 10th Results 2022 live: निकाल लवकरच...प्रवेशपत्र काढून ठेवा! रोल नंबर जन्मतारीख लक्षात ठेवा...
CBSE Results 2022Image Credit source: TV9 marathi

CBSE 10th Results 2022 live: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आज दहावीचा 14 जुलैला दहावीचा (10th Results CBSE) निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. या संदर्भांतली कुठलीही अधिकृत माहिती अजून हाती आलेली नाही. विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र (Admit Card) काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील. विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा results.gov.in जाहीर केला जाईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2022 03:34 PM (IST)

    दहावी उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक?

    सीबीएसई बोर्डाची दहावी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. 33 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी नापास मानले जातील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षा देण्याचा पर्याय असेल.

  • 14 Jul 2022 03:32 PM (IST)

    किती मुला-मुलींनी परीक्षा दिली?

    यंदा सुमारे 21 लाख मुलांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यामध्ये 8,94,993 मुली आहेत, तर 12,21,195 मुले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत 22,732 शाळांनी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या.

  • 14 Jul 2022 03:28 PM (IST)

    गेल्या पाच वर्षातील उत्तीर्णतेची टक्केवारी

    2021- 99.04 टक्के

    2020- 91.46 टक्के

    2019- 91.10 टक्के

    2018- 86.7 टक्के

    2017- 93.12 टक्के

  • 14 Jul 2022 03:27 PM (IST)

    डिजिलॉकरद्वारे निकाल कसा डाउनलोड करायचा?

    1. Google Play Store किंवा App Store वरून DigiLocker अॅप डाउनलोड करा.
    2. अॅप उघडा आणि Access DigiLocker वर क्लिक करा.
    3. CBSE कडे नोंदणीकृत फोन नंबर टाका. इतर माहिती भरा.
    4. आता CBSE मार्कशीट डाउनलोड करण्याचा पर्याय येईल. निकाल डाउनलोड करा.
  • 14 Jul 2022 03:18 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: निकाल उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार

    दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. उमंग (युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) हे केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे एक मोबाइल ॲप आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

  • 14 Jul 2022 02:48 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

    सीबीएसईकडून दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोर्डाने निकालाच्या तारखेचा आधीचा पॅटर्न पाहिला तर सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन-तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करते.

  • 14 Jul 2022 02:34 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: डिजिलॉकर ॲपद्वारे सीबीएसई 10 वी 2022 रिझल्ट

    • सीबीएसई 10 वी 2022 रिझल्ट डिजिलॉकर ॲपद्वारे
    • डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर digilocker.gov.in जा.
    • तुमच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने नोंदणी करा.
    • क्रेडेन्शियल्सच्या मदतीने डिजिलॉकर खात्यात लॉग इन करा.
    • ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’वर क्लिक करा.
    • आता ‘सीबीएसई 10 वी रिझल्ट 2022’ किंवा ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ पास सर्टिफिकेट निवडा.
    • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल, डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन करा.
    • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.
  • 14 Jul 2022 02:23 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: प्रवेशपत्र काढून ठेवा!

    विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील.

  • 14 Jul 2022 02:07 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: एकूण 21,16,209 विद्यार्थ्यांनी CBSE 10 वीची परीक्षा दिली

    • या वर्षी एकूण 21,16,209 विद्यार्थ्यांनी CBSE 10 वीची परीक्षा दिली
    • CBSE 10 वी टर्म 2 ची परीक्षा 75 विषयांमध्ये घेण्यात आली
    • 12 वीच्या वर्गाची परीक्षा 114 विषयांमध्ये घेण्यात आली.
  • 14 Jul 2022 01:55 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: तुम्ही या वेबसाइट्सवर पाहू शकता निकाल

  • 14 Jul 2022 01:30 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: कसा पाहणार निकाल?

    • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
    • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
    • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
    • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
    • तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.

Published On - Jul 14,2022 1:24 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.