CBSE 10th Results 2022: CBSE 10वी निकालाची मोठी (CBSE 10th Result 2022 Update) अपडेट हाती येतीये. सीबीएसई दहावीचा निकाल 4 जुलैला लागण्याची शक्यता वर्तविली जात होती दरम्यान याच संदर्भातली ही अपडेट आहे. आज सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) निकाल लागणार नाही हे स्पष्ट करण्यात आलंय. CBSE PRO रमा शर्मा यांनी याबाबतची माहिती दिलीये. दहावी बोर्डाचा निकाल लागण्याआधी सांगितले जाईल असं रमा शर्मा यांनी नमूद केलंय. CBSE PRO रमा शर्मा यांनी सांगितले, हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि सोशल मीडिया हॅन्डल्सवर जाहीर केला जाईल. सीबीएसई आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त पत्राला दिलेल्या माहितीनुसार सीबीएसई 10 वी निकाल 2022 च्या घोषणेसंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना (Official Notification) दिली गेली नाही. आज 4 जुलैला हा निकाल लागण्याची शक्यता नाही. निकाल लागण्याआधी तशा सूचना दिल्या जाणार आहेत. दरम्यान निकाल कधी जाहीर होणार, याबाबत आता नव्या बातम्या येऊ लागल्या आहेत. बोर्डाच्या जवळच्या एका सूत्राने असे म्हटले आहे की सीबीएसई टर्म २ च्या निकालासाठी 10 जुलै किंवा 13 जुलै ही अधिक संभाव्य तारीख आहे. त्याचबरोबर हा निकाल 15 जुलैपर्यंत सुद्धा जाहीर केला जाऊ शकतो. बोर्ड cbse.gov.in आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे.
या वर्षी एकूण 21,16,209 विद्यार्थ्यांनी CBSE 10 वीची परीक्षा दिली. CBSE 10 वी टर्म 2 ची परीक्षा 75 विषयांमध्ये घेण्यात आली. 12 वीच्या वर्गाची परीक्षा 114 विषयांमध्ये घेण्यात आली.