CBSE 12 Result 2022 | खासगी पेक्षा सरकारी शाळांची चमकदार कामगिरी, जाणून घ्या कोणी मारली बाजी आणि कोण राहिलं मागे

CBSE 12 Result 2022 News | सीबीएसई निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळासोबतच इतर दोन संकेतस्थळ results.gov.in आणि digilocker.gov.in यावरही निकाल बघता येईल.

CBSE 12 Result 2022 | खासगी पेक्षा सरकारी शाळांची चमकदार कामगिरी, जाणून घ्या कोणी मारली बाजी आणि कोण राहिलं मागे
सीबीएसईचा निकाल लागला Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 2:06 PM

CBSE 12 Result 2022 News | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12 वीच्या दुसऱ्या सत्राच्या निकालांची (Result) घोषणा केली आहे. सीबीएसईच्या इयत्ता 12 वीच्या 2022 मधील निकालाची घोषणा बोर्डाने (Board) शुक्रवारी सकाळी 9.40 वाजता केली. इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना त्यांचा निकाल बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ (Official Website) cbseresults.nic.in वा results.cbse.nic.in यावर जाऊन पाहता येईल. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्याला त्याचा परीक्षा क्रमांक, जन्मतारीख आणि शाळा क्रमांकाची आवश्यकता राहिल. ही सर्व माहिती विद्यार्थ्याला त्याचा परीक्षा प्रवेश पत्रावर(hall ticket) सहज उपलब्ध आहे. परीक्षा देताना प्रत्येक विषयाचा पेपर सोडविताना विद्यार्थ्याने त्याचा परीक्षा क्रमांक (Exam roll number) टाकलेला आहे. त्यामुळे त्याला बिचकण्याचे कारण नाही. परीक्षा प्रवेश पत्रावर ही संबंधित माहिती संकेतस्थळावर जाऊन नोदंवली की काही सेकंदात विद्यार्थ्याला त्याचा निकाल समोर दिसेल. यामध्ये सर्व विषयांची प्रगती त्याला दिसेल आणि एकूण किती गुण मिळाले याची ही माहिती मिळेल.

सीबीएससीची निकालाची परंपरा कायम

सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या निकालाची घोषणा करण्यात आल्या सोबतच यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही बोर्डाने जाहीर केली आहे. या आकडेवारीने सीबीएसईच्या निकालाची परंपरा कायम ठेवल्याचे समोर आले आहे. यावर्षी 92.17 टक्के विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर निकालाची घोषणेसोबतच विद्यार्थ्यांना इतर दोन संकेतस्थळावरही निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या दोन संकेतस्थळांची नावे results.gov.in आणि digilocker.gov.in अशी आहेत. यावरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्याची सुविधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या सत्रातील पेपर ला 30 गुणांकन तर दुसऱ्या सत्रातील पेपरला 70 गुणांकन देण्यात आले. चला तर जाणून घेऊयात या परीक्षेत कोणत्या शाळांनी बाजी मारली आहे ते. CBSE 12th Result 2022 Check Linkhttps://results.gov.in/

हे सुद्धा वाचा

दरम्यान बोर्डाच्या परीक्षेतील एकूण निकालाची टक्केवारी 92.71 राहिली. यापूर्वी बोर्डाची परीक्षा 2020 मध्ये झाली होती. त्यावेळी परीक्षेचा निकाल 88.78 टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेचा निकाल थोडासा पिछाडीवर आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये एकूण निकाल 99.37 टक्के लागला होता. यंदा सीबीएसई परीक्षेत त्रिवेंद्रमने सर्वात दमदार कामगिरी केली आहे. त्रिवेंद्रमचा एकूण निकाल 98.83 टक्के लागला आहे. सीबीएसईच्या परीक्षेत सर्वात कमी निकाल लागला आहे तो प्रयागराज जिल्ह्याचा. या जिल्ह्यातील 83.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.