80 टक्के फुफ्फुसाला संसर्ग, वर्गणीच्या पैशातून उपचार, अकोल्याचा पठ्ठ्या कोरोनाला हरवून UPSC च्या मुलाखतीसाठी सज्ज

| Updated on: Sep 10, 2021 | 5:03 PM

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जपळपास 80 फुफ्फुसाला संसर्ग झालेले देवानंद तेलगोटे शेवटी कोरोनाला हरवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या 22 सप्टेंबर रोजी ते मुलाखतीला सामोरे जातील.

80 टक्के फुफ्फुसाला संसर्ग, वर्गणीच्या पैशातून उपचार, अकोल्याचा पठ्ठ्या कोरोनाला हरवून UPSC च्या मुलाखतीसाठी सज्ज
devanand-telgote
Follow us on

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जपळपास 80 फुफ्फुसाला संसर्ग झालेले देवानंद तेलगोटे शेवटी कोरोनाला हरवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या 22 सप्टेंबर रोजी ते मुलाखतीला सामोरे जातील. रात्रंदिवस अभ्यास करुन ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे ते मुलाखत देऊ शकले नव्हते. सध्या ते ठणठणीत असून त्यांच्यावर हैदराबदच्या केआयएमएस रुग्णालयात उपचार करण्यात आले. (devanand telgote upsc aspirant from akola damaged lungs because of corona now recovered will give interview on 22 september)

कोरोनाची लागण झाली अन् मुलाखत लांबली

अकोला जिल्ह्याचे देवानंद तेलगोटे यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची मुलाखत होती. मात्र, त्याआधीच त्यांना कोरोनाने गाठले. रचाकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखील देवानंद युपीएससीची तयारी करत होते. मुलाखतीसाठीदेखील देवानंद यांची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. पण सुधारणा होण्याऐवजी त्यांची प्रकृती चांगलीच ढासळली.

मित्र, नातेवाईकांनी एक कोटी रुपये जमवले

पुढे हा संसर्ग वाढत गेला आणि देवानंद यांच्या  फुफ्फुसालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. 15 मेपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. देवानंद तेलगोटे यांना एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) या प्रणालीवर ठेवण्यात आले होते. ईसीएमओवर उपचार करणे हे महागडे असल्यामुळे देवानंद यांच्यावर उपचार करणे कठीण होऊन बसले होते. शेवटी त्यांच्यासारख्या होतकरु तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये जमवण्यात आले. तेलगोटे यांचे मित्र तसेच नातेववाईकांनी ही सगळी रक्कम जमा केली. याच खर्चातून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

फुफ्फुसाला 80 टक्के संक्रमण झालेले असतानाही प्राण वाचले

सध्या देवानंद यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी आनंदी आहेत. 80 टक्के फुफ्फुसाला संक्रमण झालेले असतानाही त्यांचे प्राण वाचल्यामुळे महाराष्ट्रातून आनंद व्यक्त केला जातोय. तर त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांविषयी माहिती देताना आम्ही कृत्रिम फुफ्फुस बसवण्याचाही विचार करत होतो. पण आमच्या टीमने तेलगोटे यांच्यावर तब्बल चार महिने उपचार केल्यामुळे त्यांचा प्राण वाचू शकला, अशी माहिती केआयएमएस रुग्णालय प्रशासनाने दिली.

येत्या 22 सप्टेंबरला मुलाखत होणार

देवानंद तेलगोटे यांच्यासारख्या होतकरु तरुणाचा प्राण वाचवण्यासाठी मित्र तसेच नातेवाईकांनी केलेली मदत न विसरण्यासारखी आहे. आता तेलगोटे मुलाखत देऊ शकतील. येत्या 22 तारखेला त्यांची मुलाखत आहे, अशा शब्दांत देवानंद यांच्या कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या :

Railway Jobs : दहावी पास तरुणांना मोठी संधी, रेल्वेमध्ये मेगाभरती!

SSC CGL 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, उत्तरतालिका प्रसिद्ध

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात परीक्षेशिवाय SSC अधिकारी होण्याची संधी, वाचा सविस्तर

(devanand telgote upsc aspirant from akola damaged lungs because of corona now recovered will give interview on 22 september)