बारावी नंतर चुकूनही या श्रेत्रात शोधू नका करिअरच्या संधी

तीन वर्षाची पदवी झाल्यानंतर तुम्हाला मास्टर्स किंवा नोकरीची चिंता करत बसावे लागेल. कारण विज्ञान शाखेतील काही अभ्यासक्रम आता अशे आहेत की ज्यांना काहीच किंमत नाही यामध्ये प्रवेश घेऊन तुम्हाला पुढे काहीच उपयोग होणार नाही.

बारावी नंतर चुकूनही या श्रेत्रात शोधू नका करिअरच्या संधी
what after 12th
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 7:35 PM

सध्याच्या काळामध्ये मुलांना कोणत्या श्रेत्रात आवड आहे हे समजून घेऊनच मग १२ वी नंतर करिअर पर्याय निवडले जातात.कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी आहेत आणि मास्टर कोर्स सारख्या बाबी लक्षात ठेवून करिअरचे पर्याय निवडावे लागतात.विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. खरंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या युगात अनेक विषयांचे मूल्य पूर्णपणे नष्ट झाले.

जर तुम्ही कॉलेजमध्ये बीएससी किंवा इतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर आताच विचार करा नाहीतर असे होईल की तुमची तीन वर्षाची पदवी झाल्यानंतर तुम्हाला मास्टर्स किंवा नोकरीची चिंता करत बसावे लागेल. कारण विज्ञान शाखेतील काही अभ्यासक्रम आता अशे आहेत की ज्यांना काहीच किंमत नाही यामध्ये प्रवेश घेऊन तुम्हाला पुढे काहीच उपयोग होणार नाही.

चुकूनही या अभ्यासक्रमाला घेऊ नका प्रवेश

वनस्पतीशास्त्र:

वनस्पती विज्ञानातील बहुतेक अभ्यासक्रमानमध्ये आता जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि पर्यावरण शास्त्राचा समावेश करण्यात आला त्यामुळे आता वनस्पती शास्त्राची वेगळी पदवी घेण्यात काहीही अर्थ राहिला नाही.

प्राणीशास्त्र:

प्राणी शास्त्राशी संबंधित विषय आता वन्य जीवन संरक्षण पर्यावरण शास्त्र आणि जीवशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये देखील शिकवले जातात त्यामुळेच आता प्राणीशास्त्रात विद्यार्थी प्रवेश घेणे टाळतात.

मायक्रोबायोलॉजी:

एके काळी शास्त्रज्ञांसाठी मायक्रोबायोलॉजी हा सर्वोत्तम करिअर पर्याय होता. पण काही काळापासून बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक्स आणि इम्युनोलॉजी या विषयातच शिकवले जात आहे.

फिजिओलॉजी:

बारावीनंतर जर तुम्ही फिजिओलॉजी मध्ये स्पेशलायझेशन करण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका. जीवशास्त्र बायोफिजिक्स आणि न्यूरो सायन्सच्या अभ्यासक्रम आता फिजिओलॉजीचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे हा अभ्यासक्रम वेगळा केल्यास त्याचा काहीही फायदा होणार नाही.

भूविज्ञान:

पर्यावरणशास्त्र, भूभौतिकी आणि पेट्रोलियम अभियांत्रिकी मध्ये भूविज्ञानाचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे यापैकी ज्या विषयाला सर्वात अधिक वाव असेल त्या विषयात प्रवेश घेणे अधिक फायदेशीर ठरेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.