मुंबई: गुगल ही अशी जागा आहे जिथे बरेच लोक काम करण्याचे स्वप्न पाहतात, परंतु तेथे नोकरी मिळविणे सोपे नाही. कंपनीच्या रिक्रूटमेंट डिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलची नोकरी मिळणे अत्यंत कठीण आहे कारण त्यांच्याकडे दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक अर्ज करतात. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यापेक्षाही कठीण आहे! म्हणूनच जर तुम्हाला गुगलमध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या रेझ्युमेवर काम करायची गरज आहे.
बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, 2012 ते 2015 पर्यंत गुगल रिक्रूटर म्हणून काम करणारे नोलन चर्च म्हणतात की रेझ्युमेमध्ये दोन मोठ्या चुका टाळा. पहिली गोष्ट म्हणजे मोठे पॅराग्राफ लिहिणे. लांबलचक वाक्य लिहिणे. जर तुमचा रेझ्युमे असा दिसत असेल तर तुमचा रेझ्युमे भरती प्रक्रियेत कधीच पुढे जाणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संक्षिप्त लिहिणे. जे काय आहे ते स्पष्ट आणि थोडक्यात लिहिणे. जर तुम्ही थोडक्यात काही सांगू शकत नसाल तर याचा अर्थ असा होतो कि तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रभावीपणे संवाद साधू शकत नाही. यासाठी नोलन चर्च ChatGPT किंवा Grammarly या AI टूल्सचा वापर करण्याचा सल्ला देतात. ही टूल्स रेझ्युमे बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
गुगलचे आणखी एक माजी अधिकारी लाझलो बॉक, ज्यांनी कंपनीत 20 वर्षे घालविली, त्यांनी तिथे असताना 20,000 पेक्षा जास्त रेझ्युमे पाहिले. काही सामान्य त्रुटीही त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. बऱ्याच रेझ्युमेमध्ये टायपिंग एरर असतं, म्हणजे स्पेलिंगच्या चुका होतात. काहींचं खराब फॉरमॅटिंग असतं किंवा काही रेझ्युमे खूप लांबलचक होतात. बॉक एक चांगला नियम सुचवितो: प्रत्येक दहा वर्षांच्या कामाच्या अनुभवासाठी रेझ्युमेचे एक पान. लक्षात ठेवा, एकदा इंटरव्ह्यू रूममध्ये गेल्यावर रिझ्युमेचा तितकासा फरक पडत नाही. म्हणून, ते सोपे ठेवा आणि अनावश्यक तपशील कमी करा.
जर तुम्ही गुगल किंवा कोणत्याही स्पर्धात्मक कंपनीत नोकरीचे ध्येय ठेवत असाल तर या टिप्स गांभीर्याने घ्या. एक सुव्यवस्थित, संक्षिप्त रेझ्युमे आपल्याला एक चांगली नोकरी मिळवून देऊ शकतो.