MPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार, 5300 जणांना नोकरी मिळणार

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली.

MPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार, 5300 जणांना नोकरी मिळणार
भरतीचा मार्ग मोकळाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:53 AM

पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी (MPSC) महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील (ZP Health Department) आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे (Corona Pandemic) आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.

5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.

पात्रता काय हवी?

आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे. आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे. आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.

हे सुद्धा वाचा

या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे होती. ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जाणार आहेत. यासाठी नोंदणी फी ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे. या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक होतं. वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.