मुंबई : सरकारी नोकरी (Government Bank Jobs) आणि ती देखील बँकेमध्ये करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनत्या वतीने बंपर भरती करण्यात येणरा आहे. आयबीपीएसच्या वतीने केल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियेत प्रोबेशनरी ऑफिसर अर्थात पीओ पदांसाठी भरती (Jobs in Bank) केली जाईल. या पदभरतीचं नोटीफिकेशनही (Bank Job Notification) जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार एकूण जवळपास साडे सहा हजार पदांची भरतीप्रकिया सुरु केली जाईल. एकूण 6432 पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही या पीओ पदासाठी अर्ज केलेला नाही, त्यांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करता येऊ शकेल. ibps.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे.
2 ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आयबीपीएसच्या वतीने तसं नोटीफिकेशन जारी करण्यात आलं होतं. ऑनलाईन पद्धतीने पीओ पदासाठी अर्ज करता येईल, असं या नोटीफिकेशनमध्ये म्हटलं होतं. या पदासाठीची परीक्षा येत्या दोन महिन्यांत कधीही होऊ शकते. तर मेन्स परीक्षा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
थेट अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज भरण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागले. तर एससी, एसटी आणि पीएच प्रवर्गासाठी 175 रुपये फी आकारली जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी शुल्कही ऑनलाईन पद्धतीने जमा करता येऊ शकेल.
आईबीपीएसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या बंपर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार पदवीधर असणं गरजेचं आहे. कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्या ट्रीममधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. तर 30 वर्य वयोमर्यादा या भरती प्रक्रियेतील इच्छिकांना घालण्यात आली आहे.