Jobs | नोकऱ्यांची येणार लाट, या क्षेत्रात मिळणार भरपूर रोजगार

Jobs | कोविडचा रोजगार क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला होता. अनेकांच्या हातचे काम सुटले होते. अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली होती. पण हे जागतिक संकट लवकर संपले. आता जग पुन्हा धावू लागले आहे. भारतात अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी समोर येत आहे. त्यात हे तीन क्षेत्र आघाडीवर असतील.

Jobs | नोकऱ्यांची येणार लाट, या क्षेत्रात मिळणार भरपूर रोजगार
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 6:08 PM

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : कोविड महामारीमुळे जग थांबले होते. अनेक लोकांचे रोजगार यामुळे हिसकावल्या गेले. दोन वेळेच्या जेवणाचे संकट उभे ठाकले. त्यानंतर रशिया-युक्रेने युद्धाने जगाला वेठीस धरले. आता इस्त्राईल-हमास युद्धाने पुन्हा जगावर संकटाचे ढग जमा झाले आहे. तरीही भारतात नोकऱ्यांची लाट येणार आहे. आयटी सेक्टरमध्ये कर्मचारी कपात सुरु असली तरी इतर अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी मिळण्याची शक्यता आहे. आयटी सेक्टर कसर इतर क्षेत्रात निघणार आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. येत्या काही दिवसांत या क्षेत्रात मोठी उलाढाल होणार असल्याने मनुष्यबळाची कुशल, अर्ध कुशल कर्मचारी, कामगारांची मोठी मागणी आहे.

या क्षेत्राला हवी माणसे

सध्या काही क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतात ट्रॅव्हल, टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात येत्या काही महिन्यात मोठी संधी उपलब्ध होईल. या क्षेत्रात मोठी उलाढाल होणार असल्याने कर्मचाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येतील, असे अंदाज आहे. आता सणासुदीत या सर्व क्षेत्रात मोठी हालचाल दिसेल. चांगल्या कामगारांची, कर्मचाऱ्यांची मोठी उणीव या क्षेत्राला भासत आहे. कोविडनंतर या क्षेत्रात बुमिंग येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

70 ते 80 हजार नोकऱ्यांची संधी

कर्मचारी सेवा पुरवठादार टीमलीजनुसार, सणासुदीच्या हंगामात पर्यटन क्षेत्रात मोठी लाट येईल. पर्यटन स्थळे गजबजतील. हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉजिंग-बोर्डिंग आणि इतर छोट्या-मोठ्या उद्योगांना मोठा आर्थिक आधार मिळेल. देशातील विविध पर्यटन स्थळे, ठिकाणांना त्याचा फायदा होईल. देशात सध्या क्रिकेट वर्ल्डकपचे विविध दहा शहरात आयोजन करण्यात आले आहे. या शहरातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. टीमलीजच्या अंदाजानुसार, येत्या काही महिन्यात 70 ते 80 हजार जणांच्या हाताला काम मिळू शकते.

हॉटेल बुकिंग वाढली

कोविडनंतर पहिल्यांदा यावर्षी हॉटेलमध्ये सर्वाधिक बुकिंग झाली आहे. बुकिंग होत असल्याने इतर व्यावसायिकांना पण चालना मिळत आहे. सणासुदीच्या काळात तर हॉटेल्स अजून गजबजतील. पर्यटनस्थळी मोठी गर्दी होईल. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार वाढतील. या सेवा क्षेत्रात ग्राहकांना सेवा देणाऱ्या उद्योगांची चलती असेल. त्यांना मोठा फायदा होईल.

हॉटेल्सची संख्या वाढली

देशातील अनेक भागात हॉटेल्स, ढाब्यांची संख्या वाढली आहे. पर्यटन स्थळावर तर मोठ्या हॉटेल समूहांनी चांगल्या दर्जाच्या हॉटेल्ससोबत टायअप केले आहे. या हातमिळवणीमुळे पर्यटकांना अत्यंत आलिशान सूखसोयी मिळत आहेत. आयटीसी, लेमन ट्री आणि इतर बडे हॉटेल समूह इतर गुणवत्ता टिकवलेले हॉटेल्सचे अधिग्रहण करत आहेत. काही जणांना त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.