Railway Job : रेल्वेची मेगा भरती! इतक्या लाख तरुणांसाठी नोकरी

Railway Job : तरुणांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Railway Job : रेल्वेची मेगा भरती! इतक्या लाख तरुणांसाठी नोकरी
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 4:33 PM

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : तरुणांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची(Indian Railway Jobs) मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय रेल्वेने पण भरती होणार असल्याचे सांगितले. सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी लवकरच भरती होईल. त्यासाठी लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

इतके पदे रिक्त

भारतीय रेल्वेच्या सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पद रिक्त आहेत. तर गृप ए आणि बी ची एकूण 2,070 पद रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी भरती होईल. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये गॅझेटेड ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ या पदांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

या कॅटेगिरीसाठी काय हवी अर्हता

  1. ग्रुप ए : युपीएससीद्वारे आयोजीत परीक्षा, सिव्हिल सेवा परीक्षा, इंजिनिअरिंग सेवा परीक्षा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.
  2. ग्रुप बी : ग्रुप बी पदांसाठी सेक्शन ऑफिसर्स ग्रेडच्या पदांचा समावेश होतो. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रतिनियुक्ती तत्त्वासाठी ग्रुप ‘सी’ चा पर्याय आहे.
  3. ग्रुप सी : या श्रेणीत स्टेशन मास्तर, तिकट कलेक्टर, क्लर्क, कमर्शियल अपरेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अपरेन्टिस आणि विविध इंजिनिअरिंगची पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि दूरसंचार, सिव्हिल, मॅकेनिकल) यांचा समावेश होतो.
  4. ग्रुप डी : ग्रुप डी मध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टेंट पॉईंट्स मॅन, स्वच्छता कामगार, गनमॅन, चपराशी, तसेच अन्य पदांचा समावेश आहे.

या पदासाठी असा करा अर्ज

  1. भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट ” Indianrailways.gov.in ” वर जा
  2. तुमचे राज्य, विभागाचा पर्याय निवडा.
  3. कोणता खास विभाग, डिपार्टमेंट हवे आहे, याची निवड करा.
  4. रिक्रूटमेंट सेक्शन बघा. त्यातील सूचना बारकाईने वाचा.
  5. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय निवडा. तो व्यवस्थित भरा.
  6. रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक आहे.
  7. त्या त्या पदासाठी शुल्क भरा. सब्मिट बटणावर क्लिक करा.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....