Har Ghar Tiranga Campaign: तिरंग्यासह सेल्फी पोस्ट करा…; विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी व्हिडिओ शेअर करत 'हर घर तिरंगा' या मोहिमेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आवाहन केले आहे की, यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्य़ा अमृत महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईः ‘हर घर तिरंगा’ (Indians Flag) मोहिमेच्या माध्यमातून देशातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grants Commission) करण्यात आले आहे. यावेळी स्वातंत्र्यदिनी देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबविण्यात येत आहे. या मोहिमेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजासह सेल्फी पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी तिरंगा मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना यूजीसीकडून काढण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना harghartiranga.com या वेबसाईटवर तिरंग्यासह सेल्फी अपलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Online Meeting of Hon’ble Chairman UGC with HEIs https://t.co/OaqRg5CVj9
— UGC INDIA (@ugc_india) August 1, 2022
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी व्हिडिओ शेअर करत ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आवाहन केले आहे की, यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्य़ा अमृत महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यूजीसीकडून सूचना
संरक्षण मंत्रालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या एसओपीच्या आधारावर, विद्यापीठ अनुदान आयोगानेने नोटीस काढली आहे. त्यामध्ये कुलगुरू, प्राचार्य आणि संचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे.
व्यापक मोहीमेपैकी एक
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणाले की, ‘हर घर तिरंगा’ मोहीम स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या ‘व्यापक मोहीमेपैकी एक आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून भारतातील 200 कोटीहून अधिक घरांमध्ये ऑगस्टमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. ही मोहीम 13 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि देशभक्ती म्हणून आणि गेल्या 75 वर्षांत भारताला एक भेट म्हणून देण्यासाठी ही मोहीम चालवली जात असल्याचे सांगितले.
विद्यार्थी तिरंगा भेट देऊ शकतील
यूजीसीने विद्यापीठाला पाठवलेल्या सूचनांमध्ये स्वातंत्र्यादिनाच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्यास सांगितले असून त्यासोबतच महाविद्यालये पथनाट्य, प्रभातफेरी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून अमृत महोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच तिरंगा खरेदी आणि भेटवस्तू देण्याची विशेष मोहीमही राबवू शकतील असंही त्यांनी सांगितले आहे.