मुंबई: राज्यात आरोग्य विभागातील पदासांठी 25 आणि 26 सप्टेंबरला क आणि ड प्रवर्गाची पदभरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य विभागानं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकला एरर येत असल्यानं परीक्षेला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं विद्यार्थी वैगतागले आहेत.
आरोग्य विभागानं पदभरती परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेली लिंक पूर्ववत कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. परीक्षेला थोडाचं वेळ शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यासमोर परीक्षांची तयारी करायची की प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी मनस्ताप सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेबसाईट कधी सुरळीत होणार याकडं विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचं आवाहन केले आहे. ही पदभरती पारदर्शक पद्धतीने होत आहे. मात्र असे असतानाही कुणी जर वशिल्याच्या गोष्टी करीत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असा सावधगिरीचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. ते आज हिंगोलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला 8 आणि 9 सप्टेंबरला होणार होती. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. आता ही परीक्षा 25 सप्टेंबरला गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गासाठी असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भरतीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीने या प्रक्रियेतील गोंधळ टाळावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी परीक्षेचे चोख नियोजन करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने कंपनीला सूचना दिल्या आहेत. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीला गोंधळ टाळण्यात अपयश आल्याचं चित्र आहे.
सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, गृह वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स-रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर, रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.
इतर बातम्या:
आरोग्य विभागातल्या भरतीसाठी दलालांच्या मागे आहात? आरोग्य मंत्री टोपे काय म्हणतात, ते लक्षात ठेवा
आरोग्य विभागाची गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली! आता परीक्षेची तारीख काय?
Health Department recruitment Admit Card website down problems continue in the process