फक्त 25 रुपयांचा अर्ज भरा अन् भरमसाठ पगाराची सरकारी नोकरी मिळवा; कुणी काढली व्हॅकन्सी?
अनेक पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण 322 पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे, विशेष म्हणजे या सरकारी नोकऱ्या असून जे इच्छुक आहे त्यांनी तातडीने अर्ज करावा...
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) अनेक पदांसाठी व्हेकन्सी काढल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी ही मोठी संधी आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता निश्चित केलेली आहे. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा असेल तर युपीएससीच्या upsconline.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) वतीने एकूण 322 पदाची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी या पदासाठी नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या विषयांसाठी स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर पदाच्या देखील व्हेकेन्सी निघाल्या आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या पदांसाठी विविध स्वरुपाची शैक्षणिक अर्हता हवी आहे. उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ पदासाठी बॅचलरची डिग्री हवी आहे.उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ या पदासाठी मास्टर डिग्री गरजेची आहे.स्पेशलिस्ट ग्रेड – 3 असिस्टंट प्रोफेसर ( फोरेन्सिक मेडीसिन ) या पदासाठी एमबीबीएस पदवी गरजेची आहे. तसेच स्पेशलिस्ट ग्रेड-3 असिस्टेंट प्रोफेसर ( जनरल मेडिसिन ) साठी देखील एमबीबीएसची पदवी असणे गरजेचे आहे. ही शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात.
वयाची अट काय ?
युपीएससीच्या या नोकऱ्यांसाठी उमेदवारांसाठी वयाची देखील अट ठेवण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांचे वय 35 ते 40 दरम्यान असायला हवे. यूआर/ ईडब्ल्यूएस यासाठी 35 वर्षे आणि ओबीसींसाठी 38 वर्ष वयाची अट आहे. तर एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 40 वर्षे आणि PWD साठी 45 वयाची अट आहे.
अर्जाची फी किती?
यूपीएससी मधील या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही शुल्क अर्जासोबत भरावे लागणार आहे. खुल्या गटातील उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, SC, ST आणि PWBD गटातील उमेदवारांसाठी अर्जा सोबत कोणतीही फी भरावी लागणार नाही. त्यांना संपूर्णपणे मोफतपण अर्ज भरता येणार आहे.
निवड प्रक्रिया आणि वेतन
UPSC भरतीसाठी तो उमेदवार अर्ज करेल त्याची सर्व प्रथम पूर्वपरीक्षा होईल. यानंतर, उमेदवारांची मुख्य परीक्षा, नंतर पीईटी, पीएसटी आणि मुलाखत होईल. निवडीच्या शेवटच्या फेरीत जीडी होईल. निवड झाल्यानंतर, उमेदवारांना वेतनश्रेणी स्तर 10 अंतर्गत 56,100 ते 1,77,500 रुपये वेतन मिळेल. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 13 जूनपर्यंत आहे.