HPCL Recruitment 2021 | भारतातील ‘या’ आघाडीच्या तेल कंपनीत 200 अभियंत्यांसाठी भरती प्रक्रिया
HPCL Recruitment 2021 | हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरशन लिमिटेडमध्ये अभियंत्यांची भरती सरु आहे.
नवी दिल्ली: देशातीली आघाडीची तेल कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरशन लिमिटेडमध्ये अभियंत्यांची भरती सरु आहे. मेकॅनिकल इंजिनीअर, सिव्हील इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, इन्स्ट्रुमेंटेंशन अभियंता हे शिक्षण घेतलेले उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील ते अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याची गरज आहे. (Hindustan Petroleum Corporation ltd announced 200 engineer vacancies)
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवर जाऊन उमेदवार 3 मार्चपासून अर्ज करु शकतात. अभियंता पदासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 15 एप्रिल आहे.
पदविभागणी
एचपीसीएलकडून देशातील उमेदवारांकडून मेकॅनिकल इंजिनीअर पदासाठी 120, सिव्हील इंजिनीअर पदासाठी 30, इलेक्ट्रीकल इंजिनीअर 25 आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियंत्यांच्या 25 पदासाठी भरती प्रकरिया राबवण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांचा 4 वर्षे पूर्णवेळ अभियांत्रिकीचा अभ्यास झालेला असावा. उमेदवारांनी शिक्षण घेतलेली पदवी आणि संस्था अेआयसीटीई, यूजीसी मान्यताप्राप्त, अभिमत विद्यापीठाची मान्यताप्राप्त असावी. खुल्या, ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत. तर, अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 50 टक्के गुण असणं आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकत असणारे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करु शकतात. मात्र, परीक्षेच्या पुढील टप्प्यामध्ये उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.
परीक्षा फी
अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना परीक्षा फी भरण्यामधून सूट देण्यात आली आहेत. तर, खुला, ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना जीएसटीसह 1180 रुपये परीक्षा फी भरावी लागेल.
निवड प्रक्रिया
काम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा, ग्रुप टास्क आणि मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
खंडणीबहाद्दरांना समर्पण काय समजणार, चौकातलं भाषण, सैन्याचा अपमान, फडणवीसांचे ठाकरेंवर थेट वार https://t.co/nbfjmn6KLX#Devendrafadnavis | #UddhavThackeray | #BJP | #Maharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
संबंधित बातम्या:
(Hindustan Petroleum Corporation ltd announced 200 engineer vacancies)