Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage: कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा, पोरांनी कहर केलाय! 2022च्या निकालाची 12 वैशिष्ट्ये, वाचा

| Updated on: Jun 08, 2022 | 1:25 PM

निकाल पाहण्यासाठी बातमीतील लिंकवर क्लिक करा

Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage: कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा, पोरांनी कहर केलाय! 2022च्या निकालाची 12 वैशिष्ट्ये, वाचा
कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा, पोरांनी कहर केलाय!
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई: बारावीच्या निकालाची (HSC 2022 Results) सगळ्यात मोठी बातमी! बारावीचा निकाल दणक्यात लागलेला आहे. विशेष म्हणजे या वर्षीचा निकाल 94.22% लागलेला आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलेला आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन (HSC Online Result) पाहता येणार आहे. सर्वात जास्त निकाल यावर्षी कोकणचा लागलेला आहे आणि सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा आहे.विशेष म्हणजे यावर्षी सुद्धा निकालात मुलींची बाजी आहे! यूपीएससी नंतर आत्ता बारावीच्या निकालात सुद्धा मुली अव्वल आहेत. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळचा निकाल आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती काय आहेत जाणून घेऊ.

HSC 2022 Results यावर्षीच्या निकालाची वैशिष्ट्ये

  1. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा
  2. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची सवय राहिली नव्हती, परीक्षा ऑफलाईन होऊन सुद्धा राज्याचा निकाल 94.22% लागलेला आहे हे एक वैशिष्ट्यच!
  3. हे सुद्धा वाचा
  4. यावर्षीसुद्धा निकालात मुलीच अव्वल आहेत
  5. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला
  6. विभागावर निकालात कोकण अव्वल आहे, मुंबई शेवटून पहिली
  7. विभागावर निकाल- कोकण 97.21, नागपूर 96.52, अमरावती 96.34, नाशिक 95.34, लातूर 95.25, कोल्हापूर 95.07, औरंगाबाद 94.97, पुणे 93.61, मुबंई 90.11
  8. राज्यात 6 हजार 333 दिव्यांग विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती
  9. 6 हजार 333 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
  10. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95. 24
  11. सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) चा बारावीचा निकाल अद्याप लागण्यास वेळ आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  12. गेल्यावर्षी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक निकाल लागला होता. कोरोनात तब्बल 99.63 टक्के निकाल लागला होता. यात यावर्षी मोठी घट, यंदा 94.22 टक्के निकाल
  13. एकूण 2,30,769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले आहेत

वाऱ्यापेक्षा वेगात निकाल तुमच्या दारी! फक्त TV9 मराठीवर

बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे/ झालाय सर्व विद्यार्थी आणि पालकांना अतिशय वेगवान पद्धतीनं आणि अचूक निकाल मिळवायचा असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्ही हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल आपल्या टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी या https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/07212120/desktop-maharashtra-board-12th-result-2022.jpg लिंकवर क्लिक करा.

लाईव्ह ब्लॉग

मित्रांनो बारावीच्या निकालाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स, निकालाच्या ब्रेकिंग या सगळ्या माहितीसाठी टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉग भेट द्या. तुम्हाला फटाफट अपडेट्स इथे मिळतील. इथे क्लिक करा- LIVE BLOG