निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई: बारावीचा निकाल (HSC Results 2022) आज दुपारी लागणार. निकाल लागल्यानंतरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण आता यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल लागल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागणार आहे. कारण महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जरी लागला असला तरी सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) चा बारावीचा निकाल अद्याप लागण्यास वेळ आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो,बारावीची गुणपत्रिका 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता तुम्हाला तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयांत मिळणार आहे.
मिळालेल्या गुणांबाबत जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमचे पेपर पुन्हा तपासणीसाठी म्हणजेच रिचेकिंगसाठी टाकू शकता. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून मध्ये तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतिसाठी (फोटोकॉपीज) 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. रिचेकिंगसाठी अर्ज करताना अर्ज करायची पद्धतही ऑनलाईन आहे आणि त्यासाठी जी फी भरायची आहे तीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे.
बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे/ झालाय सर्व विद्यार्थी आणि पालकांना अतिशय वेगवान पद्धतीनं आणि अचूक निकाल मिळवायचा असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्ही हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल आपल्या टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी या https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/07212120/desktop-maharashtra-board-12th-result-2022.jpg लिंकवर क्लिक करा.
मित्रांनो बारावीच्या निकालाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स, निकालाच्या ब्रेकिंग या सगळ्या माहितीसाठी टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉग भेट द्या. तुम्हाला फटाफट अपडेट्स इथे मिळतील. इथे क्लिक करा