ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल
इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियानं सीए परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. ICAI CA Result 2020
ICAI CA Foundation & Inter Result: इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियानं सीए परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. आयसीएआयनं सीए फाऊंडेशन आणि सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2020) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर घोषित केला आहे. सीए फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आयसीए शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Intermediate Result 2020) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. (ICAI CA Foundation intermediate result declared at icai org check direct link)
ICAI चे चेअरमन धीरज खंडेलवाल यांनी यापूर्वी 3 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल अशी माहिती दिली होती. मात्र, त्यांनतर त्यांनी निकालाला उशीर होईल, असं म्हटलं होतं. सीए फायनल निकाल 1 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आला होता. उमेदवार त्यांचा निकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.
Results of the Chartered Accountants Intermediate Examination (Old course & New Course) and Foundation Examination held in November 2020 declared Same can be accessed at the following websiteshttps://t.co/344CfPdhymhttps://t.co/sxQNhLv0uqhttps://t.co/HS8oDSRLZn
— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) February 8, 2021
ICAI CA Foundation, Intermediate Result SMS द्वारे पाहा
सीए फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. इंटरमिडिएट ओल्ड कोर्ससाठी CAIPCOLD_<Roll Number> (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाका. त्यानंतर हा मेसेज 57575 वर पाठवावा लागेल. त्यानंतर असाच मेसेज फाऊंडेशन चा निकाल पाहण्यासाठी CAFND_<Roll Number> (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.
निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार
विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.
संबंधित बातम्या:
CAT Result 2020 | आयआयएमच्या CAT परीक्षेचा निकाल जाहीर, असं पाहता येईल गुणपत्रक
भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ
(ICAI CA Foundation intermediate result declared at icai org check direct link)