India Post GDS Recruitment 2021: पोस्टात 4368 जागांवर बंपर भरती,या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 आणि बिहार सर्कलमध्ये 1940 जागांवर भरती होणार आहे. Maharashtra and Bihar Postal circle recruitment

India Post GDS Recruitment 2021: पोस्टात 4368 जागांवर बंपर भरती,या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 11:12 AM

मुंबई: भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र आणि बिहार सर्कलसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर तर बिहार सर्कलमध्ये 1940 भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://appost.in/gdsonline/ वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 29 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ( India Post GDS Recruitment 2021 Maharashtra and Bihar Postal circle GDS and BPM recruitment application date extended)

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आता अर्ज करण्यासाठी 29 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी भरती

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर, बिहार सर्कलमध्ये 1940 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.

पगार

ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 12000 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार मिळेल.

महाराष्ट्र सर्कलमधील आरक्षणनिहाय जागा

खुला प्रवर्ग-1105, एसटी- 244, एससी -191, ओबीसी- 565, ईडब्ल्यूएस 246, दिव्यांग- 77 जागांवर भरती होणार आहे.

अर्ज कसा करायचा?

पोस्टाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. यानंतर, उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

India Post GDS Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी बंपर भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

India Post GDS Recruitment 2021: भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज

( India Post GDS Recruitment 2021 Maharashtra and Bihar Postal circle GDS and BPM recruitment application date extended)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.