India Post Recruitment 2021 : 10वी पास असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी!

भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत असाल तर 26 फेब्रुवारी 2021 पूर्वी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर appost.in वर अप्लाय करु शकता. आंध्र प्रदेश पोस्ट कार्यालय, दिल्ली पोस्ट कार्यालय आणि तेलंगणा पोस्ट कार्यालयासाठी भरती प्रक्रिया 27 जानेवारी 2021ला सुरु झाली आहे.

India Post Recruitment 2021 : 10वी पास असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी!
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 9:12 PM

मुंबई : पोस्ट खात्यानं नुकतंच आंध्र प्रदेश पोस्ट विभाग, दिल्ली पोस्ट विभाग आणि तेलंगणा रेल्वे सर्कलसाठी ग्रामीण पोस्ट सेवक भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत असाल तर 26 फेब्रुवारी 2021 पूर्वी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर appost.in वर अप्लाय करु शकता. आंध्र प्रदेश पोस्ट कार्यालय, दिल्ली पोस्ट कार्यालय आणि तेलंगणा पोस्ट कार्यालयासाठी भरती प्रक्रिया 27 जानेवारी 2021ला सुरु झाली आहे. एकूण 3 हजार 679 रिकाम्या जागांपैकी 2 हजार 296 पदासाठी आंध्र प्रदेश जीडीएस भरती 2021साठी आहे. तर 233 दिल्ली जीडीएस भरती 2021 साठी आणि 1 हजार 150 जागा तेलंगणा जीडीएस भरती 2021 साठी आहे.(Job opportunities in Indian Post Department for 10th pass students)

शिक्षणाची अट काय?

इच्छुक आणि योग्य उमेदवार भारत सरकार, राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त शाळांमधून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयांसह 10 वी पास असायला हवा. ज्या उमेदवारांनी कंम्पल्सरी किंवा ऑपश्नल विषय घेऊन इंग्रजीत शिक्षण घेतलं असेल किंवा कमीत कमी 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं असायला हवं.

अर्जाचे शुल्क काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या यूआर/ओबीसी/ईडब्ल्यूएस पुरुष/ट्रान्समॅनला अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी/महिला/ट्रान्सवुमन/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क असणार नाही.

वयाची मर्यादा काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येईल. नियमांनुसार योग्य प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.

10वी पाससाठी नोकरीची अजून एक संधी

शाची राजधानी असलेल्या दिल्लीतील जिल्हा कोर्टाने विविध पदांवर भरतीसाठी रिक्त जागा जारी केल्यात. या रिक्त जागा अंतर्गत एकूण 417 पदे भरती करण्यात येणार आहेत. राजधानी दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात गट सी आणि गट डीच्या अनेक पदांवर भरती होईल. यामध्ये 07 फेब्रुवारीपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी या रिक्त जागांची संपूर्ण माहिती मिळवावी.

पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी पास केलेली असावी. ज्यांची नोंदणी मान्यताप्राप्त मंडळाकडून झाली आहे, अशा मान्यताप्राप्त शाळेतून विद्यार्थ्यांनी चांगला गुणवत्तेसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी. त्याच वेळी, सर्व्हर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ड्रायव्हिंगचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा आणि अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे वय असावे. यात आरक्षण वर्गाच्या उमेदवारांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जनरल आणि ओबीसी पदासाठी अर्ज फी म्हणून अर्ज करण्यासाठी 500 रुपये आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये अर्ज भरावे लागतील. फी भरणे केवळ ऑनलाईन स्वीकारले जाईल. यासाठी आपण आपले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापर करू शकता.

संबंधित बातम्या :

Special story | Sarkari Naukri 2021: 10 वी आणि 12 वी पासही अर्ज करू शकतात; ‘या’ विभागांत नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert: 10 वी पाससाठी बंपर भरती, SSC MTS Exam 2020ची अधिसूचना ‘या’ तारखेला होणार जारी

Job opportunities in Indian Post Department for 10th pass students

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.