भारतीय नौदलाची SSC ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, ही आहे अंतिम तारीख
Indian Navy recruitment 2023: 29 एप्रिल रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून , 14 मे 2023 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 एप्रिल रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून , 14 मे 2023 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
यासाठी पात्र असलेले उमेदवार हे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कार्यकारी शाखा, शिक्षण शाखा आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेसाठी joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय नौदलात 242 रिक्त पदे भरण्यासाठी खुली आहे ज्यापैकी 150 रिक्त पदे कार्यकारी शाखेसाठी, 12 रिक्त पदे शिक्षण शाखेसाठी आणि 80 रिक्त पदे तांत्रिक शाखेसाठी (Technical Branch) आहेत.
भारतीय नौदल भरती 2023 साठी पात्रता निकष काय आहेत ?
या पदासांठी पात्रतेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. परदेशी विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेतील एकूण किंवा समतुल्य CGPA/सिस्टीममध्ये 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे.
तसेच एकूण किंवा समतुल्य CGPA मध्ये किमान 60% गुणांसह अंतिम वर्षातील उमेदवार असावा.
भारतीय नौदल 2023 साठी निवड प्रक्रिया कशी असेल ?
या पदासांठी केलेल्या अर्जांचे शॉर्टलिस्टिंग, हे पदवीमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या सामान्य गुणांवर आधारित असेल.