Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन; आता 10 वी पासना थेट रेल्वेत 3119 पदांवर नोकरीची संधी

भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) विविध पदासांठीच्या अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Indian railways recruitment 2021

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन; आता 10 वी पासना थेट रेल्वेत 3119 पदांवर नोकरीची संधी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:17 PM

Railway Recruitment 2021: मुंबई: जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी (Sarkari Naukri) शोधत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमध्ये अनेक पदांवर भरती सुरू आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, वेस्ट सेंट्रल रेल्वेनं विविध पदासांठीच्या अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 3119 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ज्यांना या पदांवर अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. (Indian Railways recruitment 2021 railway jobs in rrb rrc apprentice know full details)

Railway Recruitment Notification विभाग निहाय पदसंख्या

वेस्ट सेंट्रल रेल्वे (Western Central Railway): 561 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्पोर्टस कोटा (South East Central Railway): 26 सेंट्रल रेल्वे (Central Railway) : 2532 पद

पात्रता

आयटीआय आणि आयटीआय नसलेले दोन्ही उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात. दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत.

वय श्रेणी: 15 ते 25 वर्षे

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही स्कॅन केलेले कागदपत्र असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहे.

1. पासपोर्ट साईज फोटो 2. उमेदवारांचं स्वाक्षरी 3. 10वी पास सर्टिफिकेट 4. ITI पास सर्टिफिकेट

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2021, मध्य रेल्वे मधील पदासांठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च तर, वेस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये अर्ज करण्याची तारीख 27 फेब्रुवारी आहे.

निवड प्रक्रिया कशी?

उमेदवारांची निवड ही मेरीटच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांचं मेरीट त्याचे 10वीचे मार्क आणि ITI मध्ये मिळालेल्या मार्कावर ठरवलं जाईल. महत्वाची बाब म्हणजे या भरती पक्रियेसाठी कोणतीही लिखीत परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

संबधित बातम्या:

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन; आता 10 वी पासना थेट रेल्वेत नोकरीची संधी

Central Railway Recruitment 2021: मुंबईत रेल्वेमध्ये 2500+ अ‍ॅप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

(Indian Railways recruitment 2021 railway jobs in rrb rrc apprentice know full details)

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.