इस्राइलमध्ये या खास जॉबसाठी भारतीयांची मोठी मागणी, मिळतो इतक्या वर्षांचा व्हीसा
पाश्चिमात्य देशात भारतीयांना आयटी किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातील इंजिनिअरना मोठी मागणी असते. परंतू इस्रायलमध्ये भारतीयांना वेगळ्याच नोकरीसाठी सर्वाधिक मागणी आहे. पाहा कोणता जॉब ?
तेल अवीव | 10 ऑक्टोबर 2023 : इस्राइलवर पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने हल्ला केल्याने तेथील भारतीय देखील संकटात आले आहेत. या युद्ध जर लांबले तर भारतीयांना देशात आणण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे. त्यामुळे तेल अवीव स्थित भारतीय दूतावास अलर्ट झाला आहे. या दुतावासाने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले असून कायम संपर्कात रहाण्याचे आवाहन केले आहे. भारतीय पाश्चिमात्य देशात नोकरीसाठी जातात. दरवर्षी इस्राइलमध्ये जाणारे भारतीय देखील मोठ्या संख्येने आहेत. येथे आयटी किंवा इतर जॉबपेक्षा वेगळ्याच जॉबसाठी भारतीयांना खूप मागणी आहे. यात पैसे देखील भरपूर मिळतात.
जसे राहणीमान चांगले होते तसे लोक श्रीमंत होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजीसाठी या लोकांना वेळ देता येत नाही. अमेरिका, जपान या देशांसह इस्राइलला देखील ही गोष्ट लागू पडते. येथील लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही. त्यामुळे या लोकांना शुश्रूषेसाठी नर्सेसची गरज असते. आपल्या घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी भारतीय लोकांना खूप मागणी असते. हे केअरगिव्हर त्यांच्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांचा योग्य सांभाळ करण्यासाठी हवे असतात.
ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी
इस्राइलमध्ये जेष्ठांची लोकसंख्या खूप वाढली आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोपच्या मते इस्राइलमध्ये साल 1950 नंतर 65 वयानंतरच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. आता ही संख्या 18 पट झाली आहे. हाय फर्टीलिटी रेटमुळे इस्राइलची अवस्था अजून जपान किंवा चीनसारखी झाली नसली तर त्या वाटेवर आहे. बुजुर्गाच्या देखभालीसाठी इस्राइल कुटुंबे केअरगिव्हर भाड्याने घेत आहेत. यात भारतीय टॉपवर आहेत. संयम आणि व्यावसायिक कौशल्य गुणांमुळे त्यांना भारतीय पसंद आहेत. येथील 14 हजार भारतीय हेच काम करीत आहेत.
किती मिळतो पगार
येथे इंडीयन केअरगिव्हरना खूप मागणी आहे. त्यांना इतर देशांहून जादा पगार आहे. सव्वा लाख ते तीन लाखापर्यंत त्यांना पगार देण्यात येतो. प्रति तास किमान 900 रु.पगार आहे. रहाण्याचा आणि खाण्याचा खर्च वेगळा, वैद्यकीय खर्चही तेच करतात. येथे केवळ शुक्रवार दुपार ते शनिवार दुपारपर्यंत सुटी मिळते. इतर देशांसाठी केअर गिव्हरसाठी नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन आवश्यक असते. परंतू भारतीयांना यात सूट आहे. येथे त्यांना संवादासाठी केवळ हिब्रु शिकविण्यात येते. इतर देशात कोणत्याही देशात इंग्रजी गरजेचे असते. येथे तसे नाही. केरळ, कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रातील अनेक भारतीय येथे नोकरीला आहेत.