UPSC CISF AC Results 2022 : ‘यूपीएससी सीआयएसएफ एसी’चा निकाल हाती, केवळ लेखी परीक्षेचा निकाल जारी, पुढची फेरी कधी आणि कुठे ? इथे क्लिक करा जाणून घ्या

| Updated on: Apr 09, 2022 | 12:41 PM

जाहीर झालेल्या निकालात रोल नंबर असूनसुद्धा ज्या उमेदवारांना कुठलीही नोटीस/ सूचना मिळाली नसेल अशा उमेदवारांनी त्वरित सीआयएसएफ अधिकाऱ्यांना संपर्क साधावा.

UPSC CISF AC Results 2022 : यूपीएससी सीआयएसएफ एसीचा निकाल हाती, केवळ लेखी परीक्षेचा निकाल जारी, पुढची फेरी कधी आणि कुठे ? इथे क्लिक करा जाणून घ्या
'यूपीएससी सीआयएसएफ एसी'चा निकाल हाती !
Image Credit source: Facebook
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय लोक सेवा आयोगाकडून (UPSC) सीआयएसएफ एसी (CISF AC) 2022 चा निकाल (Result) जारी करण्यात आलेला आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार निकाल जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन upsc.gov.in निकाल बघू शकतात. यूपीएससी सीआयएसएफ एसी 2022 चे हाती आलेले निकाल हे केवळ लेखी परीक्षेचे आहेत. ही परीक्षा 13 मार्च  2022ला आयोजित करण्यात अली होती. या निकालातून पुढच्या फेरीसाठी एकूण 77 उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं आहे. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST) , शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PTE), वैद्यकीय मानक चाचणी (MST) साठी उपस्थित राहावं लागणार आहे. आपला रोल नंबर किंवा नावाच्या आधारे उमेदवार आपला निकाल बघू शकतात. शारीरिक मानक चाचणी (PST) , शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PTE), वैद्यकीय मानक चाचणी (MST) साठीची तारीख, वेळ आणि चाचणी कुठे घेतली जाईल यासंदर्भातली सूचना उमेदवारांना दिली जाईल असं यूपीएससी सीआयएसएफ एसी 2022 च्या निकालासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

जाहीर झालेल्या निकालात रोल नंबर असूनसुद्धा ज्या उमेदवारांना कुठलीही नोटीस/ सूचना मिळाली नसेल अशा उमेदवारांनी त्वरित सीआयएसएफ अधिकाऱ्यांना संपर्क साधावा.

असा चेक करा निकाल

  • लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in जा
  • होम पेजवर एक स्क्रोल होणारी विंडो येईल, त्यात सीआयएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई (LDCE) 2022 नावाची एक लिंक येईल त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ फाईल सोबत एक नवीन पेज उघडेल
  • निकाल पाहण्यासाठी यात स्क्रोल करा.
  • जर तुमचं नाव शॉर्ट लिस्ट केलेलं असेल तर तत्यात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल (CISF) भरती अंतर्गत असिस्टंट कमांडण्ट (AC) या पदाची भरती केली जाते. हा निकाल केवळ लेखी परीक्षेचा असून शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची शारीरिक मानक चाचणी (PST) , शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PTE), वैद्यकीय मानक चाचणी (MST) घेऊन फायनल रिझल्ट प्रसिद्ध केला जाईल.

 

इतर बातम्या :

Wardha Mahavitaran | वीजजोडणी नसताना शेतकऱ्याला 20 हजारांचे देयक; पोहणा येथे वीज कंपनीचा मनमानी कारभार

साताऱ्यात Sharad Pawar यांच्या उपस्थितीत होणार केसरी कुस्ती स्पर्धेचे अंतीम सामने

Udyanraje On Pawar : कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन