Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात लागणार लॉटरी, होणार मेगा पदभरती

Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात तरुणांना लवकरच लॉटरी लागणार आहे. या विभागात मोठी पदभरती होऊ घातली आहे. त्यामुळे रिक्त जागांसाठी आताच तयारी करा.

Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात लागणार लॉटरी, होणार मेगा पदभरती
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 1:55 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात लवकरच तरुणांना लॉटरी (Maharashtra Jalsampada Recruitment 2023)लागेल. त्यांना नोकरीची संधी मिळेल. या विभागात मोठ्या प्रमाणावर पद भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून जलसंपदात नोकरीचे दार बंद आहे. 2013 मध्ये या विभागात पदभरती झाली होती. आता पुन्हा पद भरती होण्याची शक्यता आहे. पुढील महिना त्यादृष्टीने महत्वाचा आहे. या महिन्यात पदभरती होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच या पद भरतीची तयारी करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याविषयीची अधिकृत माहिती दिली नसली तरी, जलसंपदा विभागात पद भरती होण्याची चर्चा रंगली आहे.

नोकर भरतीची चर्चा

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात अनेक दिवसांपासून पद भरती होण्याची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी कोरोना काळात सर्वच प्रक्रिया थंड बस्त्यात गेल्या. पण आता निवडणुकांचा लवकरच हंगाम सुरु होईल. त्याअगोदर राज्य सरकार तरुणांना सरकारी नोकरी देण्याची तयारी करु शकते. यासंबंधीची अधिकृत कोणतीही माहिती नसली तरी नोकरी भरती करण्यात येणार ही चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या जागांसाठी भरती

जलसंपदा विभागात एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिवसापूर्वी, अनेकांना या भरतीसाठी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजीपूर्वी याविषयीची अधिसूचना जारी होऊ शकते. या खात्यातील नोकर भरतीची प्रक्रिया लवकरच होईल.

सरळसेवा भरती

जलसंपदा विभागात गट क संवर्गात सरळसेवा पध्दतीने भरती होईल. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

गट ड पदासाठी भरती

गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहे. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल.

अनुशेष भरुन निघणार

जलसंपदा विभागात 2013 पासून कोणतीही नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे या विभागात रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. लवकरच हा अनुशेष दूर करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

कधी होईल पद भरती?

जलसंपदा विभागात नोकर भरती कधी होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भरतीची अधिसूचना अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पण 15 ऑगस्टपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ शकते, अशी शक्यता आहे.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.