CCIL Recruitment : भारतीय कापूस महामंडळात पदभरती, अशी मिळेल मोठी संधी

| Updated on: Jul 26, 2023 | 2:50 PM

CCIL Recruitment : भारतीय कापूस महामंडळात मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पद भरती होत आहे. पुढील महिन्यात या तारखेला ही भरती प्रक्रिया होणार आहे.

CCIL Recruitment : भारतीय कापूस महामंडळात पदभरती, अशी मिळेल मोठी संधी
Follow us on

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : भारतीय कापूस महामंडळात नोकर भरती (CCIL Recruitment 2023) होत आहे. तरुणांना मोठी संधी आहे. मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेकांना या पदासाठी अर्ज केला आहे. तुम्ही मागे तर राहिला नाहीत ना? या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2023 रोजी ही आहे. कापसा संबंधीचे व्यवस्थापन ही संस्था करते. या संस्थेत नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना चांगले वेतन मिळेल. या पदासाठी आवेदन करण्याचे शुल्क किती आहे? कधी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल? जाणून घ्या.

असा करा ऑनलाईन अर्ज

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांना पदानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. 13 ऑगस्ट 2023 रोजी या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. उमेदवार cotcorp.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

सविस्तर माहिती

उमेदवारांना cotcorp.org.in या संकेतस्थळावर पदाविषयीची सविस्तर माहिती मिळेल. कोणत्या पदासाठी, काय पात्रता आहे, याचा तपशील मिळेल. एकूण 93 जागांसाठी ही पदभरती राबविण्यात येईल. त्यासाठीची शैक्षणिक माहिती, पात्रता याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)

मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 6 जागांसाठी पदभरती होईल. या पदासाठी एमबीए एग्री बिझनेस मॅनेजमेंट, एग्रीकल्चर ही शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

मॅनेजमेंट ट्रेनी

अकाऊंट्स मॅनेजमेंट ट्रेनीच्या 6 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सीए, सीएमए, एमबीए फायनान्स, एमएमएस, एसकॉम वा इतर वाणिज्य शाखेतील पदवीधरांना या पदासाठी अर्ज करता येईल.

ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह

ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह या पदासाठी बीएससी एग्रीकल्चरमध्ये उमदेवाराला कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहे. 81 पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यात येईल.

वयोमर्यादा काय

या तीन ही पदासाठी वयोमर्यादा निश्चित आहे. या पदासाठी 30 वर्षे ही वयोमर्यादा आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनी, अकाऊंट्स मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह या तीनही पदांसाठी अर्ज करताना वयाची मर्यादा लक्षात ठेवा.

पगार किती?

मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनी- 30,000-1,20,000 रुपये

अकाऊंट्स मॅनेजमेंट ट्रेनी- 30,000-1,20,000 रुपये

ज्यूनिअर कमर्शिअल एक्झिक्युटीव्ह- 22,000-90,000 रुपये

अर्जासाठी किती लागेल शुल्क

खुला व इतर प्रवर्गासाठी शुल्क – 1500 रुपये

एससी, एसटी, दिव्यांग – 500 रुपये