Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jobs | मुंबई, दिल्ली, बंगळुरूच नाही, आता तुमच्या शहरातही मिळणार चांगली नोकरी, Mikro Grafeio या नव्या स्टार्टअपचा दावा काय?

मिक्रो ग्रेफियो या स्टार्टअपचे संस्थापक संतोष महालिंगम म्हणतात, मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये भारताची बहुतांश मॅनपॉवर वापरली जाते. मात्र आम्ही लहान शहरांवर भर दिला तर त्याचे परिणाम दिसू लागलेत.

Jobs | मुंबई, दिल्ली, बंगळुरूच नाही, आता तुमच्या शहरातही मिळणार चांगली नोकरी, Mikro Grafeio या नव्या स्टार्टअपचा दावा काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : मिक्रो ग्रेफियो हा शहरातील बेरोजगार तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरतोय. ऑफिल लिजिंग इंडस्ट्रीच्या क्षेत्रात एक नवी सुरुवात. चांगली नोकरी मिळण्यासाठी लहान शहरांतून दरवर्षी लाखोंच्या संख्येने तरुण आपलं घर सोडून मोठ्या शहरात जातात. भारतात तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या भरपूर आहे. लाखो तरुण नोकरीच्या शोधात फिरत असतात. मात्र सगळ्यांनाच नोकरीची संधी मिळत नाही. काहीजण खूप मेहनत करून एखाद्या मोठ्या शहरात किंवा विदेशात नोकरी मिळवतात. आपली स्वप्न साकार करतात. मात्र अनेकांची अशी स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाहीत. अशा तरुणांना त्यांच्याच शहरात नोकरी मिळाली तर…?

मिक्रो ग्रेफियोचा हाच उद्देश…

बंगळुरू येथील व्यावसायिक संतोष महालिंगम यांनी मिक्रो ग्रेफियो (Mikro Grafeio) नावाचा नवा स्टार्ट अप सुरु केला आहे. हा स्टार्टअप तरुणांना त्यांच्याच शहरात नोकरी मिळवण्यासाठी मदत करत आहे. स्थानिक पातळीवर व्यवसायांना प्रोत्साहन देणे तसेच स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल आहे. विविध शहरांत या स्टार्टअपचं काम सुरु झालं आहे. स्थानिक नगरपालिका, उद्योगपती तसेच स्टार्टअप्सनीदेखील या मोहिमेचं स्वागत केलंय.

कशी सूचली कल्पना?

संतोष महालिंगम हे केरळचे राहणारे आहेत. ३० वर्षांपूर्वी त्यांनी एमबीए पूर्ण केलं. पण त्यांना त्यांच्या शहरात तसेच जवळपासच्या मोठ्या शहरातही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना ३५० किमी दूर बंगळुरू येथे जावं लागलं. त्यांनी २७ वर्षे बँकिंग सेक्टरमध्ये काम केलं. कोरोना काळात लोकांनी घरातून काम केलेलं त्यांनी पाहिलं. घरात किंवा लहान शहरातही ऑफिस असू शकतं, हे दिसून आलं. त्यातून त्यांना या नव्या स्टार्टअपची कल्पना सूचली.

मिक्रो ग्रेफियो नेमकं काय करतं?

संतोष यांनी मोहन मॅथ्यू, जयशंकर सीतारमन, रैंचू नायर आणि श्याम कुमार यांच्यासोबत मिक्रो ग्रेफियोची स्थापना केली. लहान शहरांमध्ये मोठ्या कंपन्या ऑफिस सुरु करण्याची हिंमत करत नाहीत. मात्र मिक्रो ग्रेफियोकडून त्यांना इथे येण्यास प्रोत्साहन दिलं जातं. संतोष आणि त्यांची टीम भारतीय आणि विदेशी कंपन्यांच्या ऑफिसपर्यंत जाते. लहान शहरातही ऑफिस सुरु होऊ शकतं हे समजावून सांगते. लहान शहरात असे ऑफिस थाटून त्यांना सुविधादेखील पुरवते. तरुणांना प्रशिक्षण देते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तरुणांच्या कौशल्यांचा विकास होतो. तसेच कंपन्यांच्या कार्यकक्षाही वाढतात.

आतापर्यंत २१ शहरांत रोजगारनिर्मिती

संतोष यांनी दावा केलाय की, त्यांच्या कंपनीने आतापर्यंत देशातील २१ शहरांतून १००० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती केली आहे. विशेषतः आयटी कंपन्या, वित्त, लेखा, आर्किटेक्ट, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात संतोष यांची कंपनी बेरोजगार तरुणांना त्यांच्याच शहरात नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय. देशातील ४४ शहरांमध्ये स्टार्टअपचा विस्तार करायचा, असं त्यांचं उद्दिष्ट आहे. संतोष महालिंगम म्हणतात, भारतात ऑफिस लिजिंग इंडस्ट्री जवळपास १ कोटींची आहे. मात्र यासाठी मोठ्या शहरातच संधी आहे. भारतात ७०० पेक्षा जास्त जिल्हे आहेत. लहान शहरांतील बेरोजगारांची संख्या पाहता त्यांच्या कंपनीला खूप स्कोप आहे. सध्या त्यांचा टर्नओव्हर १० कोटी रुपयांचा आहे.