Translator Jobs : भाषेची आहे आवड ? विविध भाषाही येतात ? मग ही नोकरी अवश्य करू शकता, तगडी सॅलरीही मिळेल
Translator Eligibility : मनात काही करण्याची इच्छा असेल तर कामाची काही कमतरता भासत नाही. सध्या ऑफबीट करिअरचेही बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. बारावीनंतर कॉलेजचे शिक्षण पूर्ण करतानाच आणखी एखादा कोर्स करू शकता.
नवी दिल्ली : 12वी नंतर बरेचसे विद्यार्थी हे सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स विषयाचे शिक्षण घेऊन डॉक्टर, शिक्षक, इंजिनीअर बनून करीअर करतात. मात्र सध्या फक्त साचेबद्ध शिक्षण किंवा काम न करता ऑफबीट करिअर ऑप्शनलाही (Offbeat Careers) बरीच मागणी असल्याचे दिसत आहे. सध्या ट्रान्सलेटर, आर्टिस्ट, हॅकर्स इत्यादी अनेक करिअर ऑप्शन्सही उपलब्ध असून ते बरेच हिट होताना दिसत आहेत.
तुम्हाला जर भाषेची आवड असेल आणि दोन किंवा त्याहून अधिक भाषांचे पुरेसे ज्ञान असेल तर तुम्ही ट्रान्सलेटर (Career in Translation) म्हणून काम करून त्यातही भविष्य घडवू शकता. ग्लोबलायझेशनच्या या जमान्यात ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटरची मागणी वाढली आहे. या क्षेत्रात काम करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. मात्र या क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असेल तर कोणत्याही भाषेचे बेसिक आणि स्टॅंडर्ड, असे पुरेसे व योग्य ज्ञान असले पाहिजे.
पात्रता काय ?
ट्रान्सलेटर किंवा अनुवादक म्हणून काम करण्यासाठी उमेदवार म्हणून काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. त्या परीक्षेमध्ये किमान 55 टक्के गुण मिळाले पाहिजेत. तसेच उमेदवाराकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयातील डिग्री असावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, बंगाली किंवा हिंदीमध्ये बीए किंवा एमए करू शकता.
विदेशी कंपन्यांमध्ये मिळू शकते नोकरी
या क्षेत्रात प्रगतीसाठी बरीच संधी आहे. सध्या भारतात विदेशी कंपन्यांचे मार्केट बरेच वाढत आहे. अशावेळी त्यांना भारतीय भाषांसह इतर भाषांवर मजबूत पकड असणाऱ्या बऱ्याच उमेदवारांची गरज असते. ट्रान्सलेटर्सना खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात. अमिटी युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी इत्यादींमधून तुम्ही यासंबंधीचे कोर्स करू शकता.
लाखोंमध्ये मिळते पॅकेज
ट्रान्सलेटर किंवा भाषांतरकार म्हणून तुम्ही फ्रीलान्स म्हणूनही नोकरी करता येते. तुम्ही कंपनीत काम करत असताना मोकळ्या वेळेत भाषांतराचे काम करू शकता. ट्रान्सलेटकच्या पूर्णवेळ नोकरीमध्ये, तुम्हाला सुरूवातील तीन ते पाच लाखांचे पॅकेज मिळू शकते. इतर क्षेत्रांप्रमाणे यातही अनुभवानुसार 8 ते 10 लाखांपर्यंत पॅकेज सहज मिळू शकते.