IAF Pilot Recruitment: हवाई दलात पायलट बनायचे आहे, जाणून घ्या पदवीधर आणि 12 वी पास उमेदवारांना कसा मिळेल प्रवेश?
IAF Pilot Recruitment: हवाई दलात पायलट बनायचे आहे, जाणून घ्या पदवीधर आणि 12 वी पास उमेदवारांना कसा मिळेल प्रवेश? (know how to graduates and 12th pass candidates will get admission in IAF)
नवी दिल्ली : अनेक युवकांचे भारतीय हवाई दलात पायलट बनण्याचे स्वप्न असते. मात्र कधी कधी योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना योग्य मार्ग मिळत नाही. हवाई दलात पायलट होण्यायाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसह भरती प्रक्रियेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (know how to graduates and 12th pass candidates will get admission in IAF)
भारतीय वायु सेनेत फायटर पायलट कसे बनाल?
भारतीय हवाई दलात पायलट होण्यासाठी फ्लाईंग शाखेत प्रवेश घेणे आवश्यक आहे. एअरफोर्सच्या फ्लाईंग ब्रांचमध्ये फायटर पायलट, हेलिकॉप्टर पायलट किंवा ट्रान्सपोर्ट पायलट म्हणून देशाची सेवा करण्याची संधी मिळते. एअर फोर्स फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या विविध पात्रतेनुसार वेळोवेळी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) द्वारे स्नातक स्तरावर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएसई), राष्ट्रीय कॅडेट कॉर्पोरेशन (एनसीसी) प्रवेश आणि एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी किंवा एफसीएटी) मार्फत फ्लाईंग ब्रांच दरवर्षी दोनदा घेतली जाते. तर वरिष्ठ माध्यमिक / उच्च माध्यमिक / इंटरमीडिएट स्तरावर, युपीएससीतर्फे वर्षातून दोनदा घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातात.
12वी पास भारतीय वायु सेनेत फायटर पायलट कसे बनणार?
उच्च माध्यमिक स्तरावरील भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन 10 + 2 उत्तीर्ण झालेले तरुण वायुसेनेतील लढाऊ पायलट होण्यासाठी एअर फोर्स फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश घेण्यासाठी युपीएससीच्या एनडीए परीक्षेत सहभागी होऊ शकतात. एनडीए परीक्षेसाठी वयोमर्यादा 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे निश्चित केली आहे. युपीएससी एनडीए परीक्षेत यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) ने घेतलेल्या मुलाखत फेरी आणि मेडिकलमध्ये सहभागी व्हावे लागते. एसएसबीमधील यशस्वी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आणि हवाई दलाच्या गरजेनुसार एनडीए खडकवासलामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. यानंतर, हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर विशेष प्रशिक्षण दिले जाते. यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या कॅडेट्सना हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कायम केले जाते, तेथे त्यांना हवाई दलाच्या स्टेशनवर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळते.
ग्रॅज्युएट भारतीय वायु सेनेत फायटर पायलट कसे बनणार?
पदवीधर उमेदवार युपीएससीच्या सीडीएस परीक्षा, एनसीसी स्पेशल एन्ट्री आणि एएफकॅट परीक्षेद्वारे फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सीडीएस परीक्षेची जाहिरात युपीएससीमार्फत वर्षातून दोनदा ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात काढली जाते. सीडीएस परीक्षेस बसण्यासाठी उमेदवारांनी 10 + 2 पातळीवर भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी किंवा बीई / बीटेक उत्तीर्ण असावे. उमेदवारांचे वय 20 ते 24 वर्षे असावे. सीडीएस परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना एनडीए प्रमाणेच एसएसबीची मुलाखत व वैद्यकीय चाचणी पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर गुणवत्ता व हवाई दलाच्या पसंतीनुसार प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. यशस्वी प्रशिक्षणानंतर फ्लाईंग ऑफिसर म्हणून कायम केले जाते, तिथे त्यांना हवाई दलाच्या स्टेशनवर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळते. (know how to graduates and 12th pass candidates will get admission in IAF)
आता रासायनिक खताला हिरव्या खताचा पर्याय, जाणून घ्या कसे तयार करायचे?https://t.co/1yk2qyd1qE#greenFertilizer |#option |#chemicalFertilizer |#GoodCrop
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
इतर बातम्या
4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा