YouTube वर Video अपलोड करा, मालामाल व्हा, सोप्या टिप्स वाचा

चॅनेलचे नाव थोडंसं हटके आणि आकर्षक ठेवा, जेणेकरुन प्रेक्षकांचं लक्ष चटकन वेधलं जाईल. त्यानंतर व्हिडीओ अपलोड सुरु करा.

YouTube वर Video अपलोड करा, मालामाल व्हा, सोप्या टिप्स वाचा
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:23 PM

मुंबई : तुम्हाला व्हिडीओ बनवण्याची हौस असेल, तर या प्रतिभेतून तुम्ही तगडा पैसा कमवू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवणाऱ्या यूट्यूबर्सबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. तुम्हीही त्यांच्यासारखे नाव आणि पैसा कमावू शकता. हे करण्यासाठी आपल्याला फक्त आपले व्हिडीओ तयार करुन YouTube वर अपलोड करावे लागतील. त्यासाठी काही तांत्रिक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर चुटकीसरशी तुम्ही व्हिडीओच्या व्ह्यूजना पैशात रुपांतरित करु शकता. (know how to make good money from YouTube tips on technical facts while uploading video)

व्हिडीओ कसे आणि कुठे अपलोड करावे?

व्हिडीओ अपलोड करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी आपलं चॅनेल उघडावं लागेल. तुम्ही जीमेल आयडीच्या मदतीने सहजपणे यूट्यूब चॅनेल सुरु करु शकता. चॅनेलचे नाव थोडंसं हटके आणि आकर्षक ठेवा, जेणेकरुन प्रेक्षकांचं लक्ष चटकन वेधलं जाईल. त्यानंतर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात करा.

व्हिडीओ अपलोड करताना लक्षात ठेवा की त्याची संकल्पना चांगली असावी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला हवी. तुमच्या व्हिडीओमध्ये इतर कोणाचीही दृश्यं वापरलेली नसतील, याची काळजी घ्या. कारण तुमचा स्वतःचा कंटेंट असेल, तरच अधिक उत्पन्न मिळेल. व्हिडीओ अपलोड करताना आपल्याला त्याबद्दल काही माहिती लिहावी लागते. म्हणून व्हिडीओचे शीर्षक (टायटल), वर्णन (डिस्क्रिप्शन) आणि टॅग्जकडे विशेष लक्ष द्या. कारण यामुळे YouTube चा रीच वाढतो.

व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्सचे गणित जमवा

व्हिडीओ अपलोड केल्यानंतर व्ह्यूज सर्वात महत्त्वाचे आहेत. सोशल मीडिया, वैयक्तिक मार्केटिंगद्वारे याची जाहिरात करु शकता आणि तुमच्या व्हिडीओचे व्ह्यूज वाढवू शकता. आपल्या चॅनेलचे सबस्काईबर्स जसजसे वाढतील आणि व्हिडीओवरील व्ह्यूज आणि लाईक्समध्ये वाढ होईल, तसे आपले उत्पन्नही वाढेल.

पैसे कमवण्यासाठी काय कराल?

YouTube वर फक्त व्हिडीओ अपलोड केल्याने पैसे मिळत नाहीत. जेव्हा आपण YouTube च्या ‘मॉनेटायजेशन’ प्रोग्रामसाठी अर्ज कराल, तेव्हाच आपली कमाई सुरु होईल. अर्ज करण्यासाठी डावीकडील ‘चॅनेल’ सेक्शनमध्ये जा. तिथे आपल्याला हा पर्याय दिसेल. YouTube मॉनेटायजेशनचे नियम वारंवार बदलत असतो, म्हणूनच तुम्ही त्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. आपल्याकडे 10 हजाराहून अधिक व्ह्यूज झाल्यानंतर आपण मॉनेटायजेशन करण्याची प्रक्रिया सुरु करु शकता.

हे नियम कधीही बदलले जाऊ शकतात. एकदा मॉनेटायजेशन मंजूर झाल्यावर कमाईचे चक्र सुरु होते. व्ह्यूजच्या आकड्यानुसार कमाई वाढते. यानंतरच आपल्याला बँकेचे तपशील विचारले जातात. त्यात आपण YouTube वरुन पैसे मिळवणे सुरु कराल. यासह, आपण ब्रँडशी हातमिळवणी करुनही आपली कमाई वाढवू शकता.

संबंधित बातम्या :

यूट्यूबची सर्च आणि वॉच हिस्ट्री डिलीट कशी कराल?

(know how to make good money from youtube tips on technical facts while uploading video)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....