Police Recruitment : 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण, नव्यानं 7231 पदांची भरती करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सूत्रांची माहिती

2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या द्वारे 5297 पोलिसांची पदं भरण्यात आली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.

Police Recruitment : 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण, नव्यानं 7231 पदांची भरती करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सूत्रांची माहिती
job alertImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 3:31 PM

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) पोलीस दलातील भरतीसंदर्भात (Police Recruitment) महत्त्वाची माहिती दिली होती.राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं ते म्हणाले होते. 2019 मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेतील 5297 उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. जूनी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता 7231 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे. तसे आदेशन गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले असल्याचं कळतंय. पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी काढलेल्या आदेशामुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

7231 पदांसाठी भरती सुरु होणार

2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या द्वारे 5297 पोलिसांची पदं भरण्यात आली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. नवी पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे 7231 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याचं कळतंय.

गृह विभाग राबवणार पोलीस भरती, जिल्हा पोलीस प्रमुखांना अधिकार

सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या:

Amaravati College Reopen : अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार, नेमकं कारण काय?

सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांकडून रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा | Ramesh Deo Passed Away

Maharashtra Home Department complete Police Constable recruitment of 5297 post and 7231 Police constable recruitment will start soon

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.