Maharashtra board Result 2022 online: बारावीच्या निकालाचे सर्व ताजे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या करिअर विभागात पाहायला मिळतील. आम्ही तुम्हाला या निकालाच्या वेळोवेळी अपडेट्स देणार आहोत. निकालासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी TV9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगला भेट देत राहा. निकाल चेक करण्यासाठी तुम्ही TV9 मराठीला सुद्धा भेट देऊ शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 8 जून,2022 रोजी दु. 1:00 वा. ऑनलाईन जाहीर होईल – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. उद्या 8 जून 2022 (बुधवारी) दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..
सायन्स : 6लाख 32 हजार 994
आर्ट्स : 4 लाख 37 हजार 336
कॉमर्स : 3 लाख 64 हजार 362
व्यावसायिक अभ्यासक्रम : 50 हजार 202