मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2021 (State Service Pre Exam) चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची कट ऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी 31 मार्च 2022 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या (Mains Exam) प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस कळविण्यात येत आहे
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क 31मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022 रोजी घेण्यात येईल.खुल्या प्रवर्गासाठी 544 तर राखीव प्रवर्गासाठी 344 रुपये शुल्क असेल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 106/2021) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. https://t.co/SrWsYY986r pic.twitter.com/FwZhYqIbJQ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 30, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 7, 8 आणि 9 मे रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मधून 405 पद भरली जाणार आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/8LhYq5ebFK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 30, 2022
उपजजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक , सहकार राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, उद्योग उप संचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी , कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमि अभिलेख, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,सहकारी कामगार अधिकारी, मुख्याधिकारी गट ब, मुख्याधिकारी गट अ पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ या पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
इतर बातम्या:
Bank Jobs 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं करायचं अप्लाय?
नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा